पर्यटनच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न

By admin | Published: September 6, 2016 09:55 PM2016-09-06T21:55:32+5:302016-09-06T23:50:35+5:30

सुरेश प्रभू-विनायक राऊत : केंद्रीय मंत्री येणार जिल्हा दौऱ्यावर

Central Government's efforts to solve tourism issues | पर्यटनच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न

पर्यटनच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न

Next

मालवण : कोकणचा गतिमान विकास होत असताना अनेक समस्या भेडसावत आहेत. पर्यटनातून विकास साधण्यासाठी सीआरझेडचा ठरणारा अडसर दूर करण्यासाठी केंद्रशासन प्रयत्नशील आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनात येणाऱ्या अडचणी तसेच समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय पर्यटनमंत्री व पर्यावरण मंत्री लवकरच सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत. राज्यशासनाच्या प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत याबाबतची प्रमुख बैठक रत्नागिरी-सिंधुदुर्गात आयोजित करण्याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
मालवण मेढा येथील मंत्री प्रभू यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन खासदार विनायक राऊत यांनी घेतले. यावेळी तालुकाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नितीन वाळके उपस्थित होते.
खासदार म्हणून अनेक वर्षे सुरेश प्रभू यांनी प्रतिनिधीत्व केले. आता याच मतदारसंघातून विनायक राऊत हे खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करत आहेत. प्रभू हे देशाचे
केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणून काम पाहत असताना एकाच मतदार संघातील या दोन खासदारांची दोन्ही जिल्ह्याच्या विकासाबाबत झालेली चर्चा लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष्य लागून आहे. (प्रतिनिधी)

पर्यटन समस्या सोडविणार
सिंधुदुर्गचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून होत असताना येथील गडकिल्ल्यांची दुरुस्ती महत्वाची आहे. सीआरझेड कायद्याचा अडसरही लक्षात घेता त्यात शिथिलता देण्याबाबतही सकारात्मक विचार गरजेचा आहे. याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन व अन्य समस्या जाणून घेताना त्याही सोडवण्यावर भर दिला जाईल.


स्वदेश दर्शनमधून
विकासाला गती
केंद्र व राज्यसरकारच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यांचा गतिमान विकास साध्य केला जाईल. याबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच स्वदेश दर्शनच्या माध्यमातून सिंधुदुर्गला केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे.
मालवणसह किनारपट्टीचा पर्यटनातून विकास करताना पर्यटक व स्थानिकांना येणाऱ्या समस्या बाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

Web Title: Central Government's efforts to solve tourism issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.