जिल्ह्यात पावसाचे शतक, कणकवली तालुक्यात सर्वाधिक पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 12:07 PM2021-07-19T12:07:41+5:302021-07-19T12:15:18+5:30

Rain Flood Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 240 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 167.35 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2260.888 मि.मी. पाऊस झाला आहे.

Century of rainfall in the district, highest rainfall in Kankavali taluka | जिल्ह्यात पावसाचे शतक, कणकवली तालुक्यात सर्वाधिक पाऊस

जिल्ह्यात पावसाचे शतक, कणकवली तालुक्यात सर्वाधिक पाऊस

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात पावसाचे शतक, कणकवली तालुक्यात सर्वाधिक 240 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 240 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 167.35 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2260.888 मि.मी. पाऊस झाला आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे

दोडामार्ग - 119(2145), सावंतवाडी - 130(2380.10), वेंगुर्ला - 145(1956), कुडाळ - 144(2159), मालवण - 190(2708), कणकवली - 240(2374), देवगड - 200(2084), वैभववाडी - 170(2281), असा पाऊस झाला आहे.

तिलारी धरण क्षेत्रात 106.40 मि.मी. पावसाची नोंद

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 5 हजार 31 क्युसेक्स विसर्ग सुरू असून सध्या या प्रकल्पामध्ये 368.1440 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.29 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 106.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

उपलब्ध पाणीसाठा 

  • मध्यम पाटबंधारे प्रकल्प - देवघर -63.6480, अरुणा - 56.2984, कोर्ले- सातंडी -25.4740.
  • लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा - शिवडाव - 2.6480, नाधवडे -3.2819, ओटाव - 2.2790, देंदोनवाडी - 1.1096, तरंदळे -2.0460, आडेली - 1.2880, आंबोली- 1.7250, चोरगेवाडी - 3.2000, हातेरी-1.9630, माडखोल-1.6900, निळेली - 1.7470, ओरोस बुद्रुक - 2.2200.
     

महत्वाच्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ 

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांच्या पाणीपातळीत आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार वाढ झाली असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.

तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 39.200 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 8.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 6.500 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर.

Web Title: Century of rainfall in the district, highest rainfall in Kankavali taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.