दत्ता सामंत यांच्या वर्णीची शक्यता

By admin | Published: July 8, 2014 12:40 AM2014-07-08T00:40:48+5:302014-07-08T00:42:54+5:30

काँग्रेस जिल्हाध्यक्षपद : फेरबदलाचे संकेत

Chance of Datta Samant | दत्ता सामंत यांच्या वर्णीची शक्यता

दत्ता सामंत यांच्या वर्णीची शक्यता

Next

महेश सरनाईक ल्ल कणकवली
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्षाला उभारी देवून पुन्हा विधानसभा निवडणुकीत यश मिळविण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांची आगामी राजकीय रणनिती लक्षवेधी ठरणार आहे. जिल्ह्यातील काँग्रेस अंतर्गत काही फेरबदल होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली असून यामध्ये नारायण राणे यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक दत्ता सामंत यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक गावागावात काँग्रेसची मजबूत पकड आहे. गेल्या २५ वर्षात नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांची फळीच तयार केली आहे. असे असताना लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातून ६५ हजारांचे मताधिक्य शिवसेना उमेदवाराला मिळाले. त्यामुळे नारायण राणे यांच्याबरोबरच त्यांचे सुपूत्र काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे नाराज आहेत.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे विश्लेषण करताना नीतेश राणे यांनी खासदार नीलेश राणे यांचा पराभव पक्षात वाढलेली ठेकेदारी आणि आप्तस्वकियांमुळेच झाल्याचे कणकवलीत पत्रकार परिषद घेवून जाहीर केले होते. पुढील काळात जर जिल्हावासीयांना पडते, कुडाळकर, सावंत, तेली ही नावे आमदार म्हणून हवी असतील तर त्यांनी तसे जाहीर करावे आपण त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करण्यास तयार असल्याचे खोचक विधान केले होते. त्यानंतर राजन तेली, संजय पडते आणि काका कुडाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून या टीकेला उत्तरदेखील दिले. नीतेश राणे यांच्या भूमिकेचे काँग्रेसमधील एका गटाने कणकवली आणि कुडाळमध्ये फटाके वाजवून स्वागतदेखील केले होते.
नीतेश राणेंच्या विधानानंतर जिल्ह्यात काँग्रेसअंतर्गत धुसफूसत असलेल्या ज्वालाग्नीचा जणू स्फोटच झाला होता. मागील आठवड्यात घडलेल्या या सर्व घटनानंतर नारायण राणे रविवारपासून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. रविवार आणि सोमवार हे दिवस ते कणकवलीत वास्तव्यास आहेत. तर मंगळवारी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठकदेखील होणार आहे. या बैठकीत राणे कोणती भूमिका मांडतात. या विषयावर कशाप्रकारे भाष्य करतात. याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.दरम्यान, सोमवारी काका कुडाळकर, राजन तेली, संजय पडते यांनी नारायण राणे यांच्या निवासस्थानी हजेरी लावली होती. परंतु यावेळी कोणती चर्चा झाली याबाबतची माहिती समजू शकली नाही.

Web Title: Chance of Datta Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.