पुलमावा हल्ल्याचा बदला, वेंगुर्ले भाजपकडून जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:22 AM2019-02-27T11:22:20+5:302019-02-27T11:24:56+5:30
भारताच्या वायुसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन बालाकोट येथील दहशदवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करत पुलमावा हल्ल्याचा बदला घेतला. यानिमित्त वेंगुर्ले भारतीय जनता पार्र्टीच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून जल्लोष केला.
वेंगुर्ले : भारताच्या वायुसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन बालाकोट येथील दहशदवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करत पुलमावा हल्ल्याचा बदला घेतला. यानिमित्त वेंगुर्ले भारतीय जनता पार्र्टीच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून जल्लोष केला.
यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, शहर अध्यक्ष सुषमा खानोलकर, जिल्हा चिटणीस साईप्रसाद नाईक, नगरसेवक नागेश गावडे, धर्मराज कांबळी, प्रशांत आपटे, श्रेया मयेकर, तालुका सरचिटणीस रवींद्र्र शिरसाट, मच्छीमार नेते दादा केळुसकर, निवती सरपंच भारती धुरी, दाभोली उपसरपंच संदीप पाटील, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, तुळस सरपंच शंकर घारे, सुरेंद्र्र चव्हाण, रफीक शेख, दीपक माडकर, किरण तोरसकर, सत्यवान परब, वृंदा गवंडळकर, निलेश मांजरेकर, उमेश परब, संदीपकुमार बेहरे, प्रितम सावंत, प्रकाश मोटे, अरुण नेवाळकर, बाबुराव मेस्त्री, अनंत केळजी, सुधीर गावडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर हल्ला करावा, अशी भारतीयांची इच्छा होती. ती इच्छा भारतीय वायूसेनेने पूर्ण केल्याचे नगराध्यक्ष गिरप यांनी सांगितले. तर पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांनी सैन्याला संपूर्ण सूट देऊन मनोधैर्य वाढविल्यानेच वायूसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल, असे तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई म्हणाले.