चौकेत कारला दुचाकीची धडक

By admin | Published: July 17, 2016 11:44 PM2016-07-17T23:44:34+5:302016-07-17T23:47:48+5:30

अपघातात चालक गंभीर जखमी : कासारटाका मार्गावर पोलिस बंदोबस्त हवा

Chaukat car hit two-wheeler | चौकेत कारला दुचाकीची धडक

चौकेत कारला दुचाकीची धडक

Next

मालवण : चौके-कुडाळ मार्गावर चौके पेट्रोलपंपानजीक भरधाव मोटारसायकलने कारला समोरून धडक दिल्याची घटना घडली आहे. कासारटाका येथून मालवणच्या दिशेने भरधाव वेगाने चालवत असलेल्या मोटारसायकलस्वाराने मालवणहून कुडाळकडे जाणाऱ्या कारला समोरून धडक दिली आहे. यात मोटारसायकलचे नुकसान झाले असून कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. अपघातात मोटारसायकलस्वार रुपेश लांबोर (मालवण) याला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत कारचालक सौगंधराज बादेकर यांनी मालवण पोलिसात तक्रार दिली आहे. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली.
दरम्यान, अपघातात दुचाकी चालकाची चूक असतानाही लांबोर हा कारचालकाच्या अंगावर धावून गेला होता. त्यावेळी त्या मार्गावरून जाणाऱ्या काही तरुणांनीही त्याला साथ केली. मात्र गंभीर जखमी झालेल्या लांबोर याला मालवणातील तरुणानी रिक्षेतून मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातानंतर काहीकाळ वाहतूक खोळंबली होती.
घटनास्थळी पोलिसांनी जावून पंचनामा केला. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत पोलिसी कार्यवाही सुरु होती. पावसाळी हंगाम सुरु झाला की धामापूर कासारटाका मार्गावर मद्यधुंद युवकांचा धुडगूस सुरु असतो. मद्यपानात आपापसात मारामारीचेही प्रकार घडले असून गंभीर अपघातही घडले आहेत. कासारटाका येथे रविवार, बुधवार, शुक्रवार या तीन वारांना मोठी गर्दी असते. त्यामुळे अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडीचाही मोठा प्रश्न उद्भवतो. त्यामुळे पोलिसांनी याकडे गांभिर्याने पाहून कासारटाका येथे पोलिस बंदोबस्त तैनात ठेवावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: Chaukat car hit two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.