सिंधुदूर्ग जिल्ह्यातील गावात पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी करणार : बबनराव लोणीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 05:32 PM2017-08-05T17:32:01+5:302017-08-05T17:32:01+5:30

मुंबई : सिंधुदूर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीलगत असलेल्या गावांमधील पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी करून स्वतंत्र आराखडा तयार करण्यासंदभार्तील सूचना देण्यात येतील, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत सांगितले.

Chemical investigation of drinking water in village Sindhudurg district: Babanrao Lonikar | सिंधुदूर्ग जिल्ह्यातील गावात पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी करणार : बबनराव लोणीकर

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील गावात पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी करणार : बबनराव लोणीकर

Next

मुंबई : सिंधुदूर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीलगत असलेल्या गावांमधील पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी करून स्वतंत्र आराखडा तयार करण्यासंदभार्तील सूचना देण्यात येतील, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळाशिल, आचरा व पोळम या गावातील नागरिकांना क्षारयुक्त पाणी प्यावे लागत असल्याबाबतचा प्रश्न सदस्य वैभव नाईक यांनी विचारला होता त्यास उत्तर देताना लोणीकर बोलत होते. सदस्य आशिष शेलार यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.

लोणीकर म्हणाले, किनारपट्टीलगतच्या गावांमध्ये क्षारयुक्त पाणी असेल तर आरओ सिस्टीम लावण्याचा विचार शासन करेल आणि क्षारयुक्त पाण्यासंदर्भातील समस्या सोडविण्या संदर्भातील कारवाई करण्याचे आदेश संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात येतील.

Web Title: Chemical investigation of drinking water in village Sindhudurg district: Babanrao Lonikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.