पोलिसपाटलाला बांद्यात बेदम चोप

By admin | Published: January 19, 2017 11:13 PM2017-01-19T23:13:58+5:302017-01-19T23:13:58+5:30

युवतीची छेडछाड : पोलिसांच्या दिले ताब्यात

Chhapra police brutal | पोलिसपाटलाला बांद्यात बेदम चोप

पोलिसपाटलाला बांद्यात बेदम चोप

Next



बांदा : गोव्यातून बांद्यात दुकानात काम करण्यासाठी येणाऱ्या युवतीचा सातत्याने पाठलाग करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणारा कवठणी (ता. सावंतवाडी) गावचा पोलिस पाटील व बांदा येथील बीएसएनएलच्या विभागीय कार्यालयात कंत्राटी कामगार म्हणून काम करीत असलेला रघुनाथ ऊर्फ एकनाथ मायगो जाधव (वय ३८, रा. कवठणी-जाधववाडी) याला बांद्यात ग्रामस्थांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.
युुवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत रघुुनाथ जाधवयाला गुरुवारी सायंकाळी उशिरा अटक केली. यावेळी बांद्यात आलेल्या बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बांदावासीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
तक्रारदार युवती ही बांदा येथील एका ब्युटीपार्लरमध्ये काम करते. महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेलगत असलेल्या गावातून दररोज ती बांदा येथे आपल्या चुलत बहिणीसोबत बसने प्रवास करते. गेले तीन महिने रघुुनाथ जाधव हा आपल्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. रघुुनाथ हा गेली १५ वर्षे बांदा येथील बीएसएनएलच्या कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे, तसेच गेली काही वर्षे तो कवठणी गावाचा पोलिस पाटील म्हणून कार्यरत आहे. गावातदेखील त्याच्याविरोधात बऱ्याच तक्रारी आहेत.
युवतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बसमधून बांदा येथे येताना रघुनाथ हा मुद्यामहून बसमध्ये येऊन माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. आपण याला कंटाळून बसदेखील बदलली, मात्र रघुनाथ आपला पिच्छा सोडत नव्हता. बुधवारी बसमधून उतरत असताना त्याने आपल्याला रोखायचा प्रयत्न केला. मात्र, आपण बसमधून उतरून कसेबसे ब्युटीपार्लर गाठले. मात्र, तो पाठलाग करत तेथपर्यंत आल्याने आपण याची कल्पना ब्युटीपार्लरमधील इतरांना दिली. तसेच त्याला जाबही विचारला. बांदा पोलिसांनी युवतीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत रघुनाथ याच्यावर अटकेची कारवाई केली. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम हळदणकर करीत आहेत. रघुनाथ याला शुक्रवारी सावंतवाडी येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
बीएसएनएलच्या बांदा कार्यालयाला घेराव
स्थानिकांनी बीएसएनएलच्या बांदा विभागीय कार्यालयात घेराव घालत रघुनाथ याला बेदम मारहाण केली. तसेच जोपर्यंत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत त्याला कोंडून ठेवण्याचा इशारा दिला. त्यानंतर कनिष्ठ अभियंता डी. जे. जाधव व आय. व्ही. जाधव कार्यालयात दाखल झाले. स्थानिकांनी त्यांना धारेवर धरले. तसेच रघुुनाथला तत्काळ सेवेतून कमी करण्याची मागणी केली. त्यावेळी रघुनाथला काढून टाकल्याचे अभियंता जाधव यांनी सांगितल्याने जमाव शांत झाला.

Web Title: Chhapra police brutal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.