मुख्यमंत्र्यांचे सिंधुदुर्गवर विशेष लक्ष : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 12:28 PM2020-12-10T12:28:34+5:302020-12-10T12:30:28+5:30

Shivsena, DeepakKesrkar, Sawantwadi, Sindhudurngnews शिवसेनेचे हात अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून झालेली विकासकामे लोकांच्या निदर्शनास आणून द्या, असे आवाहन माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केले. ते रविवारी कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात सभासद नोंदणी कार्यक्रमात बोलत होते.

Chief Minister's special attention on Sindhudurg: Deepak Kesarkar | मुख्यमंत्र्यांचे सिंधुदुर्गवर विशेष लक्ष : दीपक केसरकर

सावंतवाडी तालुक्यात शिवसेनेच्यावतीने सभासद नोंदणी हाती घेण्यात आली आहे. यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, जान्हवी सावंत आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे सिंधुदुर्गवर विशेष लक्ष : दीपक केसरकर जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून शिवसेनेला बळकट करा

सावंतवाडी : भाताला दर सर्वाधिक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. हे शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आपल्या जिल्ह्यावर असलेल्या प्रेमामुळेच. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून त्यासाठी ९६६ कोटी रुपये मंजूर केले.

शिवसेनेचे हात अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून झालेली विकासकामे लोकांच्या निदर्शनास आणून द्या, असे आवाहन माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केले. ते रविवारी कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात सभासद नोंदणी कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी पक्ष निरीक्षक सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, चंद्रकांत कासार, महिला तालुका संघटक अपर्णा कोठावळे, उपतालुकाप्रमुख बाळू माळकर, महिला उपतालुका संघटक चित्रा धुरी, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर, विभागप्रमुख नामदेव नाईक, उपविभागप्रमुख भरत सावंत, बाळू गवस, कोलगाव सरपंच शिवदत्त घोगळे, आंबेगाव सरपंच वर्षा वरक, कोलगाव शाखाप्रमुख सुधाकर चव्हाण, दीपक नाईक, भाई सावंत, बाळू कारिवडेकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.

आमदार केसरकर म्हणाले, भाताला दर सर्वाधिक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे हे आपल्या पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आपल्या जिल्ह्यावर असलेल्या प्रेमामुळेच. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून त्यासाठी ९६६ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

शिवसेनेचे हात अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी झालेली विकासकामे लोकांच्या निदर्शनास आणून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तर जिल्हाप्रमुख संजय पडते व महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत यांनी संघटनात्मक पद्धतीने कशा पद्धतीने काम करून जास्तीत जास्त सभासद नोंदणी होऊ शकते याचे मार्गदर्शन केले.

दडपशाही करणाऱ्यांना हद्दपार करू : सतीश सावंत

सतीश सावंत म्हणाले, आपण नेहमीच चांगल्या गोष्टीला साथ देतो. शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे हे कोणाच्या दडपणाखाली चुकीच्या पद्धतीने वापरले जाऊन बँकेचे नुकसान होऊ नये यासाठीच शिवसेनेत आलो. याठिकाणी लोकांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. कुठलेही दडपण नाही. त्यामुळे अधिक जोमाने काम करण्याचा आनंद मिळतो.

सभासद नोंदणीच्या निमित्ताने आपल्याला लोकांच्या गाठीभेटी घेण्याची संधी चालून आली आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन सभासद नोंदणी करून सदस्य बनवा. ती आपली पक्षाची ताकद असेल व भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत आपण विजय संपादन करून दडपशाही करून अन्याय करणाऱ्यांना जिल्ह्यातून हद्दपार करू, असेही ते म्हणाले.
 

Web Title: Chief Minister's special attention on Sindhudurg: Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.