..अन् सिंधुदुर्गातील चिंदरमधील ग्रामस्थांनी सोडलं गाव, गाव झाला सुना सुना; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 12:47 PM2022-11-19T12:47:40+5:302022-11-19T13:00:35+5:30

चिंदर ग्रामस्थ घरादाराला माडाच्या झावळ्या बांधून घराभोवती राख टाकून भरदूपारी उन्हाची पर्वा न करता लवकरात लवकर गावच्या वेशीबाहेर जाण्यासाठी धावू लागले होते.

Chinder villagers of Sindhudurga left the village for the village migration tradition | ..अन् सिंधुदुर्गातील चिंदरमधील ग्रामस्थांनी सोडलं गाव, गाव झाला सुना सुना; नेमकं काय घडलं?

..अन् सिंधुदुर्गातील चिंदरमधील ग्रामस्थांनी सोडलं गाव, गाव झाला सुना सुना; नेमकं काय घडलं?

Next

आचरा: तीन दिवस तीन रात्री वेशीबाहेर राहणाऱ्या चिंदर ग्रामस्थांच्या सुरक्षेचे रवळनाथ मंदिरात शिवकळेचे आशीर्वचन झाले. इशाऱ्याबरोबर ढोल वाजू लागले आणि चिंदर ग्रामस्थ घरादाराला माडाच्या झावळ्या बांधून घराभोवती राख टाकून भरदूपारी उन्हाची पर्वा न करता लवकरात लवकर गावच्या वेशीबाहेर जाण्यासाठी धावू लागले होते. एका आगळ्यावेगळ्या गावपळण परंपरेसाठी आता चिंदर गाव खाली होत होते.

तीन दिवस तीन रात्री वेशीबाहेर राहणाऱ्या चिंदर ग्रामस्थांच्या सुरक्षेचे रवळनाथ मंदिरात शिवकळेचे आशि्र्वचन झाले. इशाऱ्याबरोबर ढोल वाजू लागले. घरेबंद करुन दारावर झावळ्या बांधून घराभोवती राखेचे रिंगण घालून  भरदुपारी चिंदर ग्रामस्थ उन्हाची पर्वा न करता लवकरात लवकर गावच्या वेशीबाहेर जाण्यासाठी धावू लागले होते. गेली क्रित्येक वर्षे सुरु असलेल्याएका आगळ्यावेगळ्या गावपळण परंपरेसाठी आता चिंदर गाव या विज्ञान युगातही खाली होत होते.

कुणी खासगी वाहनांसह एसटी, रिक्षा, टेम्पोचा आधार घेत तर कोणी बैलगाडीतून जात होते. गुरंढोरांसह कुणी धावतपळत जात होते. अवघ्या काही क्षणातच गजबजलेले चिंदर गाव शांत झाले होते. आणि आता गजबजाट वाढला होता तो वेशीबाहेर . आता तीन दिवस तीन रात्री गुराढोरांसह कोंबडी कुत्र्यांसह रानावनात एकमेकांच्या साथीने निसर्गाच्या साथीने एकमेकांच्या सहवासात सहजीवनाचा आनंद घेणार आहेत.

दर तीन वर्षांनी होणाऱ्या गावपळणीसाठी पळणीचे वर्ष आल्यावर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी बारा पाच मानकरी श्री रवळनाथ मंदिरात जमून रवळनाथाला तांदळाचा एकदाच आणि एकच कौल प्रसाद घेतला जातो. त्रिसाली मर्यादा आली असून या वेळी गावपळण आणि देवपळण करण्यास तुझी परवानगी आसा काय?  अशी विचारणा  करून उजवा कौल प्रसाद झाल्यावर बारा पाच मानकरी एकत्र (मेळ्यावर) बसून पुरोहिताना विचारुन तारीख ठरवितात.

गावपळणी दिवशी चिंदरवासीयांनी शुक्रवार सकाळपासूनच गाव सोडण्याची सुरुवात केल्याचे दिसून येत होते. दुपारीच अडीच वाजण्याच्या सुमारास बारा पाच मानकरी रवळनाथ मंदिरात जमल्यावर रवळनाथाला सांगणे करून शिवकळा वाढवली गेली. सुरक्षेचे शिवकळेचे आर्शिवचन घेतल्यानंतर ढोलाचा इशारा झाला आणि चिंदरवासीय वेशीबाहेर पळू लागले. ज्या भागातील लोकांना जी वेस जवळची होती, त्या भागात गेल्या आठ दिवसांपासून झटून रानावनात उभ्या करण्यात आलेल्या झोपड्यात आता नव्या संसाराची सुरुवात केली जात होती. काहींनी पाहुण्यांचा आधार घेतला होता.या गावात ख्रिश्‍चन धर्मीयही मोठ्या आनंदाने वेशीबाहेर हिंदू धर्मीयांच्या सोबत आनंदाने राहत असल्याचे दिसून येते होते. आता तीन दिवस तीन रात्री देवाच्या भरोश्‍यावरच रानावनात आभाळाच्या छताखाली एकमेकांच्या सहवासात सहजीवनाचा आनंद घेतला जाणार आहे.

देवदीपावली दिवशी देवपळण

तीन दिवसांत त्रिंबक येथील पावणाई मंदिरात दुपारी दोन वाजता बारा पाच मानकऱ्यांचा मेळा जमतो आणि आढावा घेतला जातो. चौथ्या दिवशी न बोलता शांतपणे बारा पाच मानकरी रवळनाथ मंदिरात एकत्र येत गाव भरण्याचा देवाचा हुकूम घेतात. तो सुद्धा एकदाच घेतला जातो. तो डावा झाल्यास पुन्हा पाचव्या दिवशी कौल प्रसाद घेतला जातो. गावपळणीनंतर येथे देवपळणही केली जाते. देवदिपावली दिवशी संध्याकाळी देवपळण होते. यात रवळनाथ मंदिरातून सहा तरंग घेणारे ज्यांना खांबधूरी म्हणतात ते तसेच बारापाच मानकरी हे तीन दिवस तीन रात्री साठी बस्की ब्राह्मण मंदिरात पळून जातात.

विज्ञान युगातही परंपरा सुरु

याबाबत माहिती देताना मानकरी नारायण पाताडे सांगतात ,देवाचे आशिर्वचन झाल्यावर जापकरून गावपळणीला सुरुवात होते.  ग्रामस्थ शशिकांत नाटेकर यांनी गावपळण झाल्यावर दाराला माडाची झावळी बांधून घराभोवती राखेचे रिंगण घालून गाव सोडत असल्याचे सांगितले .तर भाई तावडे यांनी आम्ही तीन दिवस तीन रात्री भजन, फुगड्या, भेंड्या लावत मजेत आनंदाने वेळ घालवत असल्याचे सांगितले. एकूणच गेली शेकडो वर्षाची ही गावपळण परंपरा आजच्या विज्ञान युगातही सुरू आहे.

Web Title: Chinder villagers of Sindhudurga left the village for the village migration tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.