चिपी ते गोवा सागरी महामार्ग उभारणार

By admin | Published: June 18, 2015 10:34 PM2015-06-18T22:34:53+5:302015-06-18T22:34:53+5:30

दीपक केसरकर : वेंगुर्लेचा पर्यटनदृष्ट्या विकास साधणार; ११५ कोटींचा खर्च अपेक्षित

Chipi to build Goa coastal highway | चिपी ते गोवा सागरी महामार्ग उभारणार

चिपी ते गोवा सागरी महामार्ग उभारणार

Next

वेंगुर्ले : वेंगुर्लेचा पर्यटनदृष्टीने विकास करण्याच्या उद्देशाने पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता चिपी विमानतळ ते गोवा असा सागरी महामार्ग केंद्र सरकारच्या सुमारे ११५ कोटी खर्चातून उभारला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या विश्रामगृहात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वेंंगुर्लेच्या आरोग्य सुविधेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय इमारतीजवळ असलेल्या मोकळ्या जागेत ५० खाटांचे अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त रुग्णालयाची पायाभरणी लवकरच केली जाईल. तसेच सध्या सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयातील रिक्तपदे तसेच अत्याधुनिक यंत्रसामग्री जिल्हा नियोजन बैठकीत तरतूद केलेल्या अंदाजपत्रकातून त्वरित पूर्ण करावी, अशा सूचना जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
वेंगुर्ले मच्छिमारी बंदर विकसित करण्याच्या उद्देशाने येथील मच्छिमारांच्या नौका व ट्रॉलर्स खाडीत सुरक्षित राहण्याकरिता कायमस्वरूपी ड्रोजर खरेदी केला जाणार असून, शासनाकडे आणखी एक उपलब्ध असलेला ड्रोजरच्या मदतीने खाडीतील गाळ खाडी पात्राच्या बाहेर काढून तो गाळ शासनाचा महसूल वाढविण्याकरिता दिला जाणार आहे. यातून मच्छिमारांचा अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे.
वेंगुर्ले पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याच्या उद्देशाने येथील पर्यटन स्थळांचा विकास केला जाणार आहे. याकरिता अभ्यास समिती गठीत करून त्याच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून आराखडा तयार केला जाईल. सावंतवाडीत असलेला ड्रेनेज प्रकल्प वेंगुर्लेत राबविला जाणार आहे. तसेच भुयारी गटार योजना सर्वसमावेशक करण्याकरिता नगरपालिकेशी चर्चा केली जाईल.
विद्यार्थी व नागरिकांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची सत्यप्रत तातडीने उपलब्ध होण्याकरिता विशेष कार्यकारी अधिकारी यांची जिल्ह्यात नेमणूक केली जाईल. तसेच विविध कमिट्या व समित्यांवर नियुक्या करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
यावेळी वेंगुर्ले तालुका शिवसेनाप्रमुख सुरेश नाईक, शहरप्रमुख विवेक आरोलकर, सचिन वालावलकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


नागरिकांना प्रशिक्षित केले जाणार
वायंगणी येथे कासव म्युझियम, वेंगुर्ले नवाबाग येथे फिशनमन व्हिलेज, मांडवीखाडी येथे झुलता पूल, वेंगुर्ले तिठा ते कुडाळ तिठा रस्ता दुरुस्ती व नूतनीकरण, झाराप रेल्वेस्थानकाकडे जाणारा आडेली-झाराप रस्ता नूतनीकरण, वेंगुर्ले मठ येथील पुलाचे नवीन बांधकाम व रस्ता नूतनीकरण, मठ शिवाजी चौक येथील धोकादायक वळणावरील अपघात टाळण्याकरिता गतिरोधक अशी विविध कामे केली जातील.
रोजगार निर्मितीकरिता येथील साधन सामग्री व उत्पादनांवर आधारित प्रकल्प यासाठी येथील नागरिकांना प्रशिक्षित केले जाणार आहे.

Web Title: Chipi to build Goa coastal highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.