अल्पायुष्यात माधवराव पेशवेंच्या स्वभावाची चुणूक

By admin | Published: January 10, 2016 11:39 PM2016-01-10T23:39:23+5:302016-01-11T00:34:55+5:30

चारूदत्त आफळे : इंग्लंडमध्ये किल्ले बांधण्यासाठी मागितली होती जागा

Choice of Madhavrao Peshwa's nature in the short life | अल्पायुष्यात माधवराव पेशवेंच्या स्वभावाची चुणूक

अल्पायुष्यात माधवराव पेशवेंच्या स्वभावाची चुणूक

Next

रत्नागिरी : माधवराव पेशवे मुत्सद्दी होते. अल्पायुष्यात त्यांनी त्यांच्या या स्वभावाची चुणूक दाखवली. इंग्रजांनी सत्ता प्रस्थापित करण्याच्या हेतूने व्यापारी कंपनीचा माल ठेवण्यासाठी वसई, साष्टीमध्ये किल्ले बांधण्याची परवानगी मागितली. पण माधवरावांनी इंग्लंडमध्ये आम्हालाही दोन किल्ले बांधण्यास जागा द्यावी, ती मिळाली की आम्हीसुद्धा परवानगी देऊ, असे सांगून इंग्रजाची बोळवण केली. माधवराव असेपर्यंत आपल्याला येथे हातपाय पसरता येणार नाहीत याची इंग्रजांना कल्पना आली, असे विवेचन करत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी पेशवाईची महती सांगितली.
येथील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे कीर्तनसंध्या परिवार आयोजित कीर्तन ङ्कमहोत्सवाच्या चौथ्या दिवशी आफळे बोलत होते. पानिपताच्या दुसऱ्या लढाईतील विजय आणि ङ्कमाधवराव पेशव्यांचे गुणवर्णन त्यांनी केले.
उत्तररंगामध्ये ते म्हणाले की, पानिपतातील ङ्कमाघारीनंतर पराभव जिव्हारी लागला. त्यानंतर नानासाहेब पेशव्यांचे ५० दिवसांनी निधन झाले व त्यांच्या जागी १६ वर्षांच्या ङ्कमाधवराव पेशव्यांची निवड झाली. काका राघोबा (रघुनाथराव) याच्या कारस्थानी, अंत:स्थ स्वभावामुळे माधवरावांना शिंंदे, होळकर, रामशास्त्री प्रभुणे, नाना फडणवीस यांची भक्कम साथ मिळाली. अध्यात्माकडे वळलेल्या कोवळ्या वयातील माधवरावांची रामशास्त्रींनी कानउघाडणी केली. कलावंतीण, घरकामङ्क करणाऱ्या बायका, नोकर विकण्याची प्रथा रामशास्त्रींनी सर्वप्रथम बंद केली.
आफळे यांनी सांगितले की, वीस वर्षांचा ङ्कमाधवराव कर्नाटक मोहिमेवर गेल्यानंतर राघोबाने पैठण लुटले. त्यादरम्यान पुणे लुटणाऱ्या निजामाला मदत करणाराङ्कमाधवरावांचाङ्कमामा त्र्यंबक याला ५० लाखांचा दंड रामशास्त्रींनी ठोठावला. त्यावेळी आईने दंड करू नको नाहीतर ङ्कमी घर सोडून जाईन व पुन्हा कधीही भेटणार नाही अशी ङ्कमाधवरावांना शपथ घातली. पण न्यायाच्या बाजूने उभे राहून दंड दिला आणि आई गोपिकाबार्इंनी शनिवारवाडा सोडला व त्या नाशिकला गेल्या. त्यानंतर या दोघांची कधीही भेट झाली नाही.
माधवरावांबाबतचा एक किस्सा सांगितना आफळे म्हणाले की, पेशव्यांच्या परवानगीने इंग्रजांनी बंदरात उभ्या केलेल्या बोटींवरील माल विसाजी लेले यांनी लुटून स्वत:साठी ठेवला. त्या प्रकरणात न्यायदानावेळी न्यायासमोर पेशव्यांचा ङ्कमुलाहिजा ठेवणार नाही, असे रामशास्त्रींनी बजावले. त्याचा गैरअर्थ घेऊन राघोबाने रामशास्त्रींना माधवरावांसमोर उभे केले. पण माझे विधान बदलणार नाही, असे सांगितल्यानंतर ङ्कमाधवरावांनीही रामशास्त्रींना ङ्कमोत्यांची ङ्कमाळ व खंजीर दिला व ङ्कमाझ्याबाबतीतही असाच न्याय करा, असे सांगितले. ‘‘पानिपतावरील पहिल्या लढाईत झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आठ वर्षांनी ५५ हजारांची ङ्कमराठी फौज पानिपतावर गेली. क्षय झाल्यामुळे ङ्कमाधवरावांना जाता आले नाही. पण त्यांनी ‘उत्तरक्रीया’ म्हणजे उत्तर दिशेला पानिपतावर ङ्कमारल्या गेलेल्या ङ्कमराठ्यांचे श्राद्ध न करता विजय मिळवून उत्तरक्रीया करा, असा आदेश दिला. या लढाईत ङ्कमराठे विजयी झाले. यावर स्वा. सावरकरांनी उत्तरक्रीया हे नाटक लिहिले आहे. लढाईनंतर थेऊरच्या गणेशासमोर माधवरावांनी प्राण सोडला. यावेळी आफळे यांनी सादर केलेले ‘अन्यायासी राजा न करी जरी दंड, तेजोनिधी लोहगोल’ हे नाट्यपद सुरेख झाले. (प्रतिनिधी)


पाने वाहण्यापेक्षा बेल झाडे लावा
आफळे यांनी पूर्वरंगामध्ये ‘शरण हनुमंता’ या अभंगावर निरूपण केले. हनुमंताची भक्ती व नवविधा भक्ती वर्णन केली. आपण अमराठी प्रांतात गेलो की तिथली भाषा लगेच शिकतो. पण अन्य भाषिक मातृभाषेला विसरत नाहीत. त्यामुळे आपण संस्कृत व मराठीची जोपासना केली पाहिजे. परिस्थितीनुसार पद्धती बदलायला हव्यात. पूर्वी अकरा लाख बेलपत्रे वाहत असत. आता झाडं तोडली गेली म्हणून आता बेलाची पानं वाहण्याऐवजी अकरा बेलाची झाडं लावायला हवीत. हेच खरे पूजन होय, असा समाजोपयोगी संदेश आफळे यांनी यावेळी दिला.

Web Title: Choice of Madhavrao Peshwa's nature in the short life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.