आपल्या नावावर एकतरी आमदार निवडून आणा

By admin | Published: October 25, 2015 10:51 PM2015-10-25T22:51:56+5:302015-10-25T23:33:27+5:30

नीलेश राणे : मंडणगड नगरपंचायत प्रचारसभेत रामदास कदमांना आव्हान

Choose one of the legislators on your name | आपल्या नावावर एकतरी आमदार निवडून आणा

आपल्या नावावर एकतरी आमदार निवडून आणा

Next

मंडणगड : स्वत:ला कोकणचे नेते म्हणून संबोधणाऱ्या पर्यावरणमंत्र्यांनी हिंमत असल्यास आपल्या नावाने एखादा तरी आमदार निवडून आणावा, नंतरच आक्रमकतेच्या पोकळ गमजा माराव्यात, अशा शब्दांत काँग्रसचे युवा नेते नीलेश राणे यांनी रामदास कदमांवर टीका केली.मंडणगड नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेसाठी राणे मंडणगड येथे आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. ज्यांची राणेंशी नजर मिळवण्याची ताकद नाही, ते आमच्याशी काय लढणार? याउलट राणेंनी मातोश्रीच्या अंगणात निवडणूक लढवून दाखवली आहे. रामदास कदम यांची तोतरी आक्रमकता पोकळ असून, त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवण्याची गरज नाही, असे राणे म्हणाले.
कोकणातील जनतेच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. राज्यात सत्तेसाठी भाजपची भांडी घासण्याचे काम शिवसेना करीत आहे. हिंमत असेल तर वेगळी चूल मांडत सत्तेतून बाहेर पडा, असे आव्हान त्यांनी दिले. पंचवीस वर्षे लोकांकडून पान व तंबाखू खाऊन लोकांनाच चुना लावला. सडलेल्या दातांप्रमाणे जनतेला सडलेले रस्ते आंदणात दिल्यानेच जनतेने शेवटी त्यांच्या कंबरेत लाथ घातली आहे, असे राणे म्हणाले.
आमदार संजय कदम यांनी निवडणुकांनिमित्त शहरात यशस्वी केलेल्या महाआघाआडीच्या प्रयोगांचे विशेष कौतुक करताना आमदारांनी केलेला प्रयोग कोकणासह राज्यासाठी प्रेरणा देणारा असल्याचे ते म्हणाले. यावेळी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते माजी आमदार भाई जगताप, आमदार संजय कदम, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय भोसले, राष्ट्रवादी दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रकाश शिगवण, काँग्रसचे तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुलतान मुकादम, रिपाइं तालुका कार्याध्यक्ष सुभाष तांबे, सिध्दार्थ कासारे, दादासाहेब मर्चंडे, जिल्हा परिषद सदस्या अस्मिता केंद्रे, चिपळूण उपनराध्यक्ष लियाकत शहा, काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष सावंत, रमेश दळवी, संतोष मांढरे, गणेश रुखे, समद मांडलेकर, संदेश चिले, कादीर बुरोंडकर, राजा लेंढे, विनीत रेगे, अशोक कोकाटे व रघुनाथ देवरुखकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)


बाळासाहेब आमचे दैवतच : राणे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आजही आमचे दैवत आहेत. मात्र, उद्घव ठाकरेंनी पैशांसाठी आमदार व खासदारकीची तिकिटे विकली आता खांदे पाडून शिवसेनेची ताकद संपवून टाकली. शिवाजी महाराज व भगव्याच्या नावावर भावनिक भाषणे करुन जनतेची माथी भडकवण्याचा शिवसेनेचा धंदा जुना असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Choose one of the legislators on your name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.