चौैघांची नावे चर्चेत; दोघांमध्ये चुरस

By admin | Published: November 15, 2015 12:38 AM2015-11-15T00:38:26+5:302015-11-15T00:38:26+5:30

देवरूख : भाजप तालुकाध्यक्ष निवड

Choughe's names debate; Churus of both | चौैघांची नावे चर्चेत; दोघांमध्ये चुरस

चौैघांची नावे चर्चेत; दोघांमध्ये चुरस

Next

देवरुख : संगमेश्वर तालुक्यात भाजप तालुकाध्यक्ष बदलाच्या हालचाली वेगात सुरु असून, संतोष केदारी, अमित केतकर, जाकीर शेकासन आणि दीपक जाधव यांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत. मात्र, यामध्ये संतोष केदारी आणि अमित केतकर यांच्यामध्येच मुख्य चुरस आहे.
केंद्रात आणि राज्यात एकहाती सत्ता असूनही तालुक्यात भाजपच्या वाढीसाठी म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. येत्या काही दिवसात संगमेश्वर तालुका भाजपचा अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली पक्षपातळीवर सुरु आहेत. नव्या अध्यक्षांचा शोध सुरु झाला असून, या पदासाठी देवरुख येथील युवा कार्यकर्ते संतोष केदारी, साखरपा येथील युवा कार्यकर्ते अमित केतकर, माजी पंचायत समिती सदस्य जाकीर शेकासन, माजी जि. प सदस्य दीपक जाधव यांच्या नावांची चर्चा आहे.
संगमेश्वर तालुका भाजपच्या अध्यक्षपदी संगमेश्वर माभळेचे उपसरपंच दिलीप गीते कार्यरत आहेत. विधानसभा निवडणुकीआधीच माजी आमदार बाळ माने यांच्या कृपेने त्यांची अध्यक्षपदावर वर्णी लागली होती. सुरुवातीपासूनच शिवसेनेत कार्यरत असलेले गीते २००६नंतर तत्कालीन आमदार सुभाष बने यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेले. यानंतर त्यांनी माभळेचे उपसरपंचपद भूषविले. चार वर्षापूर्वी झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांना नावडी गटातून काँग्रेसकडून पंचायत समितीची उमेदवारी हवी होती. मात्र, ती जागा राष्ट्रवादीकडे गेल्याने त्यांनी बंडखोरी करत ती निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यामध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
त्या निवडणुकीत त्यांनी मिळवलेली लक्षणीय मते पाहून बाळ माने यांनी त्यांना भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले. पक्षप्रवेशावेळीच पदाची मागणी केलेल्या गीतेंची इच्छा पूर्ण करण्यात आली. मात्र, त्यानंतर तालुक्यात पक्ष ज्या पद्धतीने वाढला पाहिजे होता, तसा वाढल्याचे दिसत नाही. तालुक्यात पक्ष वाढीसाठी प्रयत्नही होताना दिसत नाही. सातत्याने संपर्कात असणाऱ्याकडेच या पदाची धुरा सोपवली जावू शकते. आता यापैकी कोण बाजी मारतो याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Choughe's names debate; Churus of both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.