नागरिकांनी कोविड लसीकरणाचा लाभ घ्यावा : महेश खलिपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 04:10 PM2021-03-02T16:10:04+5:302021-03-02T16:11:34+5:30
Corona vaccine Sindhudurgnews- कणकवली येथे चार खासगी रुग्णालयांमध्ये प्रत्येकी अडीचशे रुपये देऊन कोविड लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. दर दिवशी सरासरी शंभर नागरिकांना लसीकरण करण्यात येईल. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी केले.
कणकवली : कणकवली येथे चार खासगी रुग्णालयांमध्ये प्रत्येकी अडीचशे रुपये देऊन कोविड लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. दर दिवशी सरासरी शंभर नागरिकांना लसीकरण करण्यात येईल. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी केले.
कणकवली येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरण कक्षाचा उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, डॉ. प्रियंका खरे, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे, डॉ. निलेश कोदे, व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर, नगरसेविका कविता राणे, किशोर राणे, वर्षा बांदेकर, प्रशांत मांजरेकर, जनार्दन गोसावी, समूह संघटक निखिल जाधव, जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक रवींद्र जोशी, मिथाली मालवणकर, आरोग्य सेविका मुसळे, अविनाश राणे, शरद सुतार, प्रकाश सापळे, गोविंद चव्हाण, अनुष्का घाडीगांवकर, मानसी खोचरे, गौरी घाडी, पूजा जाधव व आदी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बंडू हर्णे म्हणाले, कोरोना महामारीत डॉ. विद्याधर तायशेटे आणि त्यांच्या टीमने चांगले काम केले आहे. त्याचबरोबर तालुका आरोग्य विभागाने अहोरात्र मेहनत घेतली. आता कोविड लसीकरण नागरिकांना दिले जात आहे. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा.