शिल्पग्राम परिसरात सावंतवाडी पालिकेच्यावतीने स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 02:47 PM2018-11-21T14:47:43+5:302018-11-21T14:48:31+5:30
सावंतवाडी शहरातील शिल्पग्राम परिसरात पालिकेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह नगरसेवक व नागरिकांनी
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील शिल्पग्राम परिसरात पालिकेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह नगरसेवक व नागरिकांनी सहभाग घेतला.
नगरपालिकेच्या वाहनाव्यतिरिक्त कुठेही कचरा टाकू नये, अशी सूचना देऊनही काही नागरिकांनी शहरातील शिल्पग्राम परिसरात कचरा टाकून परिसर अस्वच्छ केला होता. त्यामुळे पालिकेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबवून शिल्पग्राम परिसर स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत मुख्याधिकारी जयंत जावडेकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, आरोग्य सभापती आनंद नेवगी, पाणीपुरवठा सभापती सुरेंद्र बांदेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती शुभांगी सुकी, उपसभापती दीपाली सावंत, नगरसेविका भारती मोरे, नगरसेवक खेमराज कुडतरकर, कार्यालयीन कर्मचारी व स्थानिक नागरिंकांनी सहभाग घेतला.
या मोहिमेत गोळा केलेल्या कचºयात रोहन टी, प्रणव डी, अजय श्रीकांत गंभीरे, साईराज पाटील, प्रशांत के. गुरव, सिल्विया गिरकर, मंथन केळुसकर, राजश्री किरण कांबळी, साबा गावडे, राजेंद्र पवार यांची नावे नमूद असलेली कागदपत्रे तसेच वाहनाची नंबरप्लेट पुरावे म्हणून सापडले आहेत. या पुराव्यांच्या आधारे संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा नगरपालिकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
... तर पाच हजार रुपये दंड!
यापुढे सावंतवाडी शहरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, कचºयात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे संबंधितांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. नागरिकांनी कचरा रस्त्यावर न टाकता नगरपरिषदेच्या वाहनातच टाकून सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.