धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे विहिरींची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 06:06 PM2019-06-01T18:06:26+5:302019-06-01T18:07:37+5:30

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा अलिबाग या संस्थेच्यावतीने जल संवर्धन उपक्रमांतर्गत बांदा, डेगवे आणि शेर्ले या तीन गांवात विहीर स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.डेगवे येथे हा उपक्रम करण्यात आला त्यात बांदा येथुन सुमारे ६० श्री सदस्य उपस्थित होते.अत्यंत शिस्तबद्ध कार्य करत मोठ्या प्रमाणात विहिरीतील गाळ उपसण्यात आला.

Cleanliness of wells by Dharmadhikari Pratishthan | धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे विहिरींची स्वच्छता

शेर्ले येथे विहिर स्वच्छता उपक्रम राबविताना डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य ( अजित दळवी )

Next
ठळक मुद्देधर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे विहिरींची स्वच्छताबांदा, डेगवे, शेर्लेत जलसंवर्धन मोहिम

बांदा : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा अलिबाग या संस्थेच्यावतीने जल संवर्धन उपक्रमांतर्गत बांदा, डेगवे आणि शेर्ले या तीन गांवात विहीर स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.डेगवे येथे हा उपक्रम करण्यात आला त्यात बांदा येथुन सुमारे ६० श्री सदस्य उपस्थित होते.अत्यंत शिस्तबद्ध कार्य करत मोठ्या प्रमाणात विहिरीतील गाळ उपसण्यात आला.

बांदा आणि शेर्ले कापईवाडी या दोन ठिकाणी हा उपक्रम एकाच दिवशी राबविण्यात आला. यात ५५ श्री सदस्य सहभागी झाले होते. या उपक्रमात ग्रामस्थांनीही सहभाग घेतला. शेर्ले येथे सरपंच उदय धुरी, आना धुरी सहकार्य केले. या मोहिमेतून सार्वजनिक विहिरींमधून कित्येक टन गाळाचा उपसा करण्यात आला. त्यामुळे विहिरीतील झरे मोकळे होऊन पुन्हा वाहू लागले.

पाणी आटलेल्या विहिरींमध्ये पुन्हा जलस्त्रोत सुरु करुन त्यातील पाणी पुन्हा पीण्यायोग्य करणे तसेच पाण्याचे महत्व व विहिरींची स्वच्छता लोकांच्या मनात रुजवुन जनजागरण करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वेळोवेळी असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. ग्रामस्वच्छता अभियान, वृक्षलागवड व संवर्धन, स्मशानभूमी व कब्रस्तान स्वच्छता असे कितीतरी उपक्रम शिस्तबद्ध पद्धतीने राबवून समाजात समता, बंधुभाव ,राष्ट्रधर्म व आपल्या कर्तव्यांची जाणीव रुजवीली जाते. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या या निरपेक्ष कायार्चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
 

Web Title: Cleanliness of wells by Dharmadhikari Pratishthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.