सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कुटुंबियांचे सावंतवाडीशी जवळचे नाते
By अनंत खं.जाधव | Published: November 9, 2022 11:20 PM2022-11-09T23:20:09+5:302022-11-09T23:22:00+5:30
वडिलांचे शिक्षण सावंतवाडीत तर आजोबा राजघराण्याचे होते दिवाण
अनंत जाधव
सावंतवाडी : भारताचे माजी सरन्यायाधीश यशवंत चंद्रचूड यांच्यानंतर त्याचे सुपूत्र धन॔ंजय चंद्रचूड यांनी भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणू बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून शपथ घेतली.आणि चंद्रचूड कुटुंबियांचे सावंतवाडीशी असलेले नात्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. वडिल यशवंत चंद्रचूड यांचे शिक्षण सावंतवाडीत झाले तर आजोबा राजघराण्याचे दिवाण म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते.तसेच चंद्रचूड कुटुंबियांनी सावंतवाडीतील अनेक कार्यक्रमात वेळोवेळी सहभागी होत असल्याचे सावंतवाडीकर सांगतात. धनंजय चंद्रचूड यांनी बुधवारी सरन्यायाधीश म्हणून राष्ट्रपती दैपद्री मुर्म याच्या कडून शपथ घेतली त्यानंतर चंद्रचूड कुटुंबियांच्या सावंतवाडी विषयी अनेक आठवणींना उजाळा दिला सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी ही चंद्रचूड यांचे सावंतवाडीशी जवळचे नाते असल्याचे सांगितले वडील यशवंत चंद्रचूड हेही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. आता त्यांच्या सुपुत्राने सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे.त्यामुळे चंद्रचूड यांची दुसरी पिढी ही सर्वाच्चपदी विराजमान झाली असे मसुरकर म्हणाले.
चंद्रचूड हे तसे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील करसेनर गावचे रहिवासी आहेत. मात्र चंद्रचूड घराण्याची नाळ पूर्वीपासून सावंतवाडीशी जोडली गेलेली आहे.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे आजोबा विष्णू चंद्रचूड हे सावंतवाडी संस्थांनात दिवाण होते.त्या काळात माजी सरन्यायाधीश यशवंत चंद्रचूड यांचे काहि शिक्षण सावंतवाडीत झाले. त्यानंतर हे घराणे मुंबईत गेले. पुढे विष्णू चंद्रचूड यांचे पुत्र यशवंत चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले.
सर्वाधिक काळ सरन्यायाधीश म्हणून ते कार्यरत राहिले. 1978 ते 1985 या काळात ते सरन्यायाधीश होते त्यांच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण खटल्यावर निकाल लागले. सावंतवाडी संस्थानचे राजे शिवरामराजे भोसले यांनी यशवंत चंद्रचूड यांचा सत्कारही केला होता. त्यानंतर राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला धनंजय चंद्रचूड यांनी हजेरी लावली होती. सावंतवाडी संस्थानाशी चंद्रचूड घराण्याने कायम नाळ ठेवली होती. तीन पिढ्या ते सावंतवाडी संस्थानशी नाळ ठेवून होते. पूर्वी संस्थानात राजांच्या अनुपस्थितीत दिवाण हे न्याय निवाड्याचे करीत असत. धनंजय चंद्रचूड यांचे आजोबा सावंतवाडी संस्थानात दिवाण होते. पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांचे सुपुत्र यशवंत चंद्रचूड न्यायाधीश बनले. तीच परंपरा धनंजय चंद्रचूड यांनी पुढे चालू ठेवली. आता ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले आहेत.
धनंजय चंद्रचूड हे ही अनेक वेळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन गेले मात्र त्यांनी मोठ्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला नव्हता.पण आता सरन्यायाधीश म्हणून धनंजय चंद्रचूड यांची नेमणूक झाल्यानंतर चंद्रचूड कुटुंबियांच्या अनेक आठवणीना सावंतवाडी करानी उजाळा दिला.