सावंतवाडीत बंद घर फोडले, रोकड लंपास : अज्ञाताविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:10 PM2019-05-03T12:10:29+5:302019-05-03T12:11:24+5:30
सावंतवाडी-करोलवाडा येथील रफीक हेरेकर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने वीस हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत पोलीस ठाण्यात शिवपुत्रक तलवार यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सावंतवाडी : सावंतवाडी-करोलवाडा येथील रफीक हेरेकर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने वीस हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत पोलीस ठाण्यात शिवपुत्रक तलवार यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रफीक हेरेकर यांचे करोलवाडा येथे घर असून, ते मुंबई येथे असतात. शिवपुत्रक तलवार हे त्यांच्या घराची देखरेख ठेवतात.
दररोज ते घराची साफसफाई करतात आणि घरी निघून जातात. सोमवारीही त्यांनी साफसफाई केली व त्यांच्याजवळ असलेली वीस हजारांची रोख रक्कम कपाटात ठेवली आणि ते निघून गेले. चोरट्याने हीच संधी साधत कपाटातील रोख रक्कम लंपास केली.
स्थानिकांवर संशय
शिवपुत्रक तलवार हे मंगळवारी सकाळी कामावर आले. त्यांनी घर उघडले. त्यावेळी घराचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती स्थानिकांना दिली. त्यानंतर पोलिसांत तक्रार दिली.
पोलिसांनी तलवार यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अलीकडच्या काळात घरफोडीचा पहिलाच गुन्हा असून, यात स्थानिकांचा हात असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.