ढगाळ वातावरण, पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुडतुड्यांची पैदास, करपा रोगाची वाढ होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 04:25 PM2017-12-07T16:25:12+5:302017-12-07T16:33:22+5:30
ढगाळ वातावरण व पावसामुळे तुडतुड्यांची पैदास मोठ्या प्रमाणात होऊ शकते. तसेच पावसामुळे कोवळ््या पालवीवर व मोहोरावर ह्यकरपाह्ण रोगाची वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र्रातर्फे सहयोगी संचालक डॉ. पी. सी. हळदवणेकर यांनी उपाययोजना सूचविली आहे.
वेंगुर्ले : ढगाळ वातावरण व पावसामुळे तुडतुड्यांची पैदास मोठ्या प्रमाणात होऊ शकते. तसेच पावसामुळे कोवळ््या पालवीवर व मोहोरावर करपा रोगाची वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र्रातर्फे सहयोगी संचालक डॉ. पी. सी. हळदवणेकर यांनी उपाययोजना सूचविली आहे.
पाऊस थांबल्यानंतर किटकनाशक व बुरशीनाशक यांची एकत्रित फवारणी करावी. त्यासाठी लॅम्डा सायहॅलोथ्रीन (१० लिटर पाण्यात ६ मिली.) या किटकनाशकासोबत कार्बेन्डॅझीम आणि मॅनकोझेब हे दोन्ही घटक एकत्रित असलेले बुरशीनाशक (१० लिटर पाण्यात १० ग्रॅम) किंवा हेक्झाकोनॅझोल (१० लिटर पाण्यात ५ मिली.) यांची फवारणी करावी. तसेच द्र्रावणात अर्धा मिली प्रती लिटर या प्रमाणात स्टिकर मिसळावे.
काजूवर ढेकण्या कीड लागू नये म्हणून बागेमध्ये पालवी असलेल्या शेतकऱ्यांनी पालवीवर मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही १५ मिली. प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात, तर बागेमध्ये मोहोर आहे त्यांनी प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही (१० मिली. प्रति १० लिटर पाणी) या किटकनाशकाची फवारणी करावी.