कोळंबा देवाच्या जत्रेला भाविकांची गर्दी उसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 05:13 PM2019-05-06T17:13:07+5:302019-05-06T17:14:37+5:30

नांदगाववासीयांचा रक्षणकर्ता आणि नवसाला पावणारा, हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या श्री देव कोळंबा देवाच्या जत्रेला भाविकांची मोठी गर्दी उसळली. रविवारी पार पडलेल्या या जत्रेत महाप्रसादाला तर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Coalgamation of a crowd of devotees to God's womb | कोळंबा देवाच्या जत्रेला भाविकांची गर्दी उसळली

नांदगाव येथील श्री देव कोळंबा जत्रेनिमित्त पाषाण मूर्तीला भाविकांनी पुष्पहार अर्पण करीत दर्शन घेतले.

Next
ठळक मुद्देकोळंबा देवाच्या जत्रेला भाविकांची गर्दी उसळलीनांदगाववासीयांचा रक्षणकर्ता : महाप्रसादाचे भक्तांना वाटप

तळेरे : नांदगाववासीयांचा रक्षणकर्ता आणि नवसाला पावणारा, हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या श्री देव कोळंबा देवाच्या जत्रेला भाविकांची मोठी गर्दी उसळली. रविवारी पार पडलेल्या या जत्रेत महाप्रसादाला तर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

या जत्रोत्सवानिमित्त नवस बोलणे व नवस फेडणे तसेच या जत्रेचे वेगळेपण असणारे भाकरीच्या प्रसादासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. जिल्हाभरातील तसेच राज्याच्या अनेक भागातून आलेल्या असंख्य भाविकांनी श्री देव कोळंबाचे मन भरून दर्शन घेतले.
रविवारी सकाळी श्री देव कोळंबाची विधिवत पूजाअर्चा झाल्यानंतर या जत्रोत्सवास प्रारंभ झाला.

या जत्रोत्सवासाठी भाविकांचे पहाटेपासूनच आगमन होत होते. सकाळच्या सुमारास परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला. भाविकांनी सूर्योदयापासून श्री देव कोळंबाच्या दर्शनासाठी रांग लावली होती. दुपारच्या वाढत्या उन्हाबरोबरच गर्दी वाढू लागल्याने दर्शनाची रांगही लांबलचक झाली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी वाढतच होती. दरम्यान, सकाळी जत्रोत्सवास विधिवत प्रारंभ झाल्यानंतर नवस फेडण्याच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला.

जत्रोत्सवास येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय जाणवू नये यासाठी श्री देव कोळंबा देवस्थानचे अध्यक्ष नागेश मोरये व नांदगाव ग्रामस्थांनी परिपूर्ण नियोजन केले होते. यावेळी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, दर्शनासाठी रांगेची व्यवस्था, ठिकठिकाणी पाणपोई, आरोग्य केंद्राचे पथक, स्वयंसेवक यामुळे या उत्सवात सुरळीतपणा जाणवत होता. जत्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक मंडप व विद्युत रोषणाई करून मंदिर परिसर झळाळून निघाला होता.

मुंबईकरांची उपस्थिती

यावेळी सकाळच्या सत्रात श्री देव कोळंबा देवाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा दिसत होत्या. दुपारी उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. त्यानंतर नवीन नवस बोलण्याचा कार्यक्रम सुरू झाला. यावर्षी कोळंबा यात्रेसाठी जिल्ह्यातील भक्तांबरोबर मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते.
 

Web Title: Coalgamation of a crowd of devotees to God's womb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.