Sindhudurg: झाडाची फांदी अंगावर पडल्याने महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू, दोघी बचावल्या

By अनंत खं.जाधव | Published: July 23, 2024 04:08 PM2024-07-23T16:08:05+5:302024-07-23T16:09:25+5:30

सावंतवाडी : कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असताना अचानक वडाची फांदी अंगांवर पडून महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाला. सायली सतिश धुरी ...

College girl dies after tree branch falls on her body, both survive, Incident in Sawantwadi Taluka | Sindhudurg: झाडाची फांदी अंगावर पडल्याने महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू, दोघी बचावल्या

Sindhudurg: झाडाची फांदी अंगावर पडल्याने महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू, दोघी बचावल्या

सावंतवाडी : कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असताना अचानक वडाची फांदी अंगांवर पडून महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाला. सायली सतिश धुरी (वय १७, मिरिस्तेवाडी तळवडे) असे मृत युवतीचे नाव आहे. तर तिच्या दोन मैत्रिणी थोडक्यात बजावल्या. आज, मंगळवारी (दि.२३) सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे ही घटना घडली. घटनेनंतर तत्काळ सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

तळवडे बाजार पेठेतील जनता विद्यालयातून दुपारच्या सुमारास सायली तिच्या दोन मैत्रिणीसोबत कॉलेज सुटल्यानंतर घरी परतत होती. दरम्यान, अचानक वडाच्या झाडाची फांदी सायलीच्या अंगावर कोसळली. यात ती गंभीर जखमी झाली. तर तिच्या सोबतच्या दोन मैत्रिणी थोडक्यात बजावल्या. 

घटना घडताच स्थानिक ग्रामस्थांनी तिला सावंतवाडीतील कुटीर रूग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तळवडे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रूग्णालयात एकच गर्दी केली होती.

Web Title: College girl dies after tree branch falls on her body, both survive, Incident in Sawantwadi Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.