कोरोना लासिकरणामध्ये उणिवा राहू नयेत म्हणूनच रंगीत तालीम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 01:49 PM2021-01-08T13:49:21+5:302021-01-08T13:51:59+5:30
Corona vaccine Kankavli Sindhudurgnews-प्रत्यक्षात कोरोना लसीकरण करताना कोणत्याही उणिवा राहू नयेत यासाठी लसीकरण रंगीत तालीम ( ट्राय रन ) घेण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे दिली
कणकवली : प्रत्यक्षात कोरोना लसीकरण करताना कोणत्याही उणिवा राहू नयेत यासाठी लसीकरण रंगीत तालीम ( ट्राय रन ) घेण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे दिली.
कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी या लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात आली . यावेळी जिल्हाधिकारी के . मंजूलक्ष्मी यांनी भेट देत एकूण तयारीचा आढावा घेतला . तसेच नाव नोंदणी पासून लसीकरणानंतरपर्यंतच्या तयारीची पाहणी केली . तसेच काही सूचनाही केल्या.यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . हेमंत वसेकर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . श्रीमंत चव्हाण , प्रांताधिकारी वैशाली राजमाने , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . महेश खलीपे , तहसीलदार आर . जे.पवार , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय पोळ , डॉ . श्रीराम चौगुले , डॉ . सतीश टाक , डॉ . सी . एम . शिकलगार यांच्यासहित विविध विभागाचे खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते .
लसीकरणाच्या या ट्रायरन मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या २५ जणांची रंगीत तालीम घेण्यात आली . त्यानंतर पुढील टप्प्यात प्रत्यक्ष लसीकरण सुरू होईल . त्यात आरोग्य , शासकीय, महसूल , जिल्हा परिषद कर्मचारी व नंतरच्या टप्प्यात ५० ते ६० वर्षावरील नागरिक व त्यानंतर सर्वसामान्यांसाठी लसीकरण करण्यात येणार आहे .
लसीकरणाबाबत काही शंका असल्यास टोल फ्री १०७७ व जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन विभागातील फोन नंबर यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले .