संगनमताने ३१ गुंठे जागेची परस्पर विक्री

By admin | Published: May 18, 2015 10:50 PM2015-05-18T22:50:08+5:302015-05-19T00:28:41+5:30

फणसोपमधील प्रकार : तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसह चारजणांविरोधात गुन्हा दाखल

Companions in 31 Gundhas interactive sales | संगनमताने ३१ गुंठे जागेची परस्पर विक्री

संगनमताने ३१ गुंठे जागेची परस्पर विक्री

Next

रत्नागिरी : आईच्या अशिक्षीतपणाचा फायदा घेऊन तिच्यावर दबाव आणत बेकायदा वाटपपत्र तयार केले व ३१.६ गुंठे जागा संबंधितांनी आपल्या नावे केली. ही जमिन एजंटमार्फत रत्नागिरीतील प्रविण नारायण लाड याला विक्रीही करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी सुधाकर अनंत साळवी (फणसोप, टाकळेवाडी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सन १९९५ ते २५ सप्टेंबर २०१२ या कालावधीत हा गुन्हा घडला.फिर्यादी सुधाकर साळवी यांनी ज्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे त्या आरोपींमध्ये सुरेश आत्माराम साळवी, १९९५ मध्ये फणसोप येथे कार्यरत असलेले तलाठी, मंडल अधिकारी पावस कांबळे, फणसोप तलाठी श्रीमती मालगुंडकर यांचा समावेश आहे.फसवून विक्री करण्यात आलेली जागा फिर्यादी सुधाकर साळवी यांचे वडील अनंत साळवी यांच्यानावे आहे. सर्व्हे क्र. २०९, हिस्सा ४७ - २४ गुंठे, सर्व्हे क्रं. २३१, हिस्सा १३ - ३.३ गुंठे, हिस्सा ३ - ४.३ गुंठे ही तीन ठिकाणची अनंत साळवी यांच्या नावे असलेली टाकळेवाडी फणसोप येथील जागा आरोपी सुरेश साळवी यांनी फिर्यादीची आई सुमती अनंत साळवी हिच्यावर दबाव टाकून संमंती वाटप पत्र तयार केले. ७/१२ वर आपली नावे टाकली. मंडळ अधिकारी पावस, कांबळे यांच्याशी संगनमताने फसवणूक करीत वाटपपत्र तयार केले. नोंदणी न करता किंवा कार्यकारी दंडाधिकारी वा नोटरी यांच्यासमोर कागदपत्र न करता २० रुपयाच्या बॉण्ड पेपरवर वाटपपत्र तयार केले. ७/१२, फेरफार करण्यासाठी मंडल अधिकारी पावस यांच्याशी संगनमत करुन आरोपीने मुळ मालकाची फसवणूक केली. ही जागा गावातीलच इस्टेट एजंट सुनील जनार्दन पिलणकर यांच्या मार्फत रत्नागिरीतील प्रविण नारायण लाड यांना विकण्यात आली. या प्रकरणी रत्नागिरी पोलीसांनी आरोपी विरोधात भारतीय दंड विधान ४२०, ४७१, ४७४, १६७, २१८, ५०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

आईच्या अशिक्षितपणाचा घेतला फायदा.
दबाव आणत बेकायदा वाटपपत्र तयार करून ३१.६ गुंठे जमिन विकली.
एजंटमार्फत केला व्यवहार.
रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल.

Web Title: Companions in 31 Gundhas interactive sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.