सिंधुदुर्गात यंदा पावसाची पिछाडी, गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही सरासरी ४७५ मिली पाऊस कमीच

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 18, 2023 07:23 PM2023-07-18T19:23:45+5:302023-07-18T19:25:24+5:30

मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची काल, सोमवारी मध्यरात्री पासून दमदार हजेरी

Compared to last year, the average rainfall is still less than 475 ml In Sindhudurga | सिंधुदुर्गात यंदा पावसाची पिछाडी, गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही सरासरी ४७५ मिली पाऊस कमीच

सिंधुदुर्गात यंदा पावसाची पिछाडी, गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही सरासरी ४७५ मिली पाऊस कमीच

googlenewsNext

गिरीश परब

सिंधुदुर्गनगरी : मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी मध्यरात्री पासून दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्वच भागात पहाटेपासूनच संततधार पाऊस पडला. काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. शेतकरी सुद्धा आपली शेतीची कामे झपाट्याने मार्गी लावताना दिसत होता. पुढील काही दिवस हे मुसळधार पावसाचे असणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.दरम्यान गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही सरासरी ४७५ मिली पाऊस पिछाडीवर आहे.

दडी मारलेल्या पावसाने मंगळवारी पहाटेपासूनच बरसायला सुरुवात केली. अगदी दिवसभर संततधार स्वरूपाचा पाऊस पडत होता. गेले काही दिवस पाऊस न पडल्याने शेतकरी राजा चिंतेत होता परंतु आज झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी शेतीची कामे मार्गी लावली आहेत.

जिल्ह्यात इतकी झाली पावसाची नोंद

जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ३५.५ मिमी च्या सरासरीने पाऊस झाल्याची नोंद आहे. सर्वाधिक दोडामार्ग तालुक्यात ५१.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण सरासरी १३२३.६ मि.मी. पाऊस झाला आहे. देवगड- २०.०२ (१२४२.०२), मालवण- ३३.०२ (१३१७.०९), सावंतवाडी- ३९.१ (१५४९.८), वेंगुर्ला-३६.२ (१३६०.९), कणकवली- ३८ (११७५.७), कुडाळ- ४१.८ (१३४१.९), वैभववाडी- ३७ (१२३९.५), दोडामार्ग- ५१.२ (१४६५.८) असा पाऊस झाला आहे.

अद्यापही ४७५ मिमी सरासरी पाऊस पिछाडीवर

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाला आहे. आजच्या दिवसाची पावसाची नोंद घेतली असता चालू वर्षी सरासरी ४७५ मिमी पाऊस कमी झाला आहे. २०२२ मध्ये आजच्या दिवशी १७९८ मिमी सरासरी पाऊस झाला होता. सर्वाधिक पाऊस सावंतवाडी तालुक्यात २१५६ मिमी झाला होता. तर सर्वाधिक कमी पाऊस देवगड तालुक्यात १४४७ मिमी इतका झाला होता.

५१ टक्केच धरणे भरली

यंदा झालेल्या कमी पावसाने जिल्ह्यातील धरणे कासवगतीने भरत आहेत. धरणांचा आजचा अहवाल पाहता धरण केवळ ५१.४९ टक्के भरली आहेत. २०२१ मध्ये याच दिवशी ७२ टक्के तर २०२२ मध्ये ७० टक्के धरणे भरली होती. गतवर्षी चांगला पाऊस झाला होता.

आतापर्यंत झालेले नुकसान..!

आज पडलेल्या पावसामुळे कोठेही नुकसान अहवाल नाही. १७ रोजीच्या नुकसान अहवालानुसार एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ४ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. ८१ अंशतः पक्की घरे कोलसली आहेत. ५ कच्ची घरे कोसळली आहेत. ३ झोपड्या, ८ गोठे कोसळले आहेत. २ जनावरे दगावली आहेत.

शेतीची कामे अंतिम टप्प्यात..!

गतवर्षी जुलै च्या पहिल्या टप्प्यात शेतीची कामे पूर्ण झाली होती. या वर्षी तशी परिस्थीती नाही आहे. पाऊस उशिरा झाल्याने शेतीची कामे सुद्धा पुढे गेली आहेत. त्यात मध्ये मध्ये पाऊस दडी मारत असल्याने शेतीला आवश्यक पाणी नसल्याने लावणीची कामे थांबली होती. आज संततधार पावसामुळे शेतीची कामे मार्गी लावण्यात शेतकरी राजा व्यस्थ होता.

Web Title: Compared to last year, the average rainfall is still less than 475 ml In Sindhudurga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.