अतिवृष्टीची नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 02:59 PM2020-11-09T14:59:48+5:302020-11-09T15:04:03+5:30

farmar, udaysamant, sindhdurgnews अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात २३ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईसाठीचे पहिल्या टप्प्यातील साडेपाच कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. मालवण तालुक्यातील तळगाव तलाठी सजाचे उद्घाटन पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

Compensation for excess rains before Diwali: Uday Samant | अतिवृष्टीची नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी : उदय सामंत

तळगाव येथे तलाठी सजाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देअतिवृष्टीची नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी वाटप सुरू होणार साडेपाच कोटींचा निधी प्राप्त : उदय सामंत

सिंधुदुर्ग : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात २३ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईसाठीचे पहिल्या टप्प्यातील साडेपाच कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. मालवण तालुक्यातील तळगाव तलाठी सजाचे उद्घाटन पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार मोल पाठक, निवासी तहसीलदार आनंद मालणकर, सरपंच अनघा वेंगुर्लेकर, उपसरपंच अनंत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, संग्राम प्रभुगावकर, संजय पडते, मुंबईचे माजी महापौर दत्ताजी दळवी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वांशी संवाद साधता यावा व नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावता यावेत यासाठी जनता दरबार सुरू करण्यात आला आहे. हे जनता दरबार तालुकास्तरावरही घेण्यात येणार आहेत. तळगाव ग्रामपंचायत इमारतीचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे ते म्हणाले. तळगावच्या सरपंच अनघा वेंगुर्लेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांचीही भाषणे झाली.

खासदार, आमदारांचे कौतुक

आदर्श खासदार कसे असावेत हे पाहण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात यावे. या जिल्ह्याला बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते यांचा वारसा लाभला आहे. याचे जतन खासदार राऊत करीत आहेत. आमदार नाईक यांचे कामही आदर्श आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघात सर्वात जास्त तलाठी सजा आहेत. सर्वात जास्त निधी आणण्याचे कामही नाईक यानी केले आहे.

स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणार

झाराप येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी शिक्षण विभागाची जागा देण्यास ४८ तासांत मान्यता दिली आहे. सामंत म्हणाले की, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करता यावे यासाठी जिल्ह्यात जानेवारी महिन्यात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

 

Web Title: Compensation for excess rains before Diwali: Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.