लाकूड व्यापाऱ्यांच्या विरोधात तक्रारी
By admin | Published: December 10, 2014 07:25 PM2014-12-10T19:25:49+5:302014-12-11T00:04:07+5:30
तक्रारी खोट्या : व्यापाऱ्यांचा आरोप, कारवाईची मागणी
सावंतवाडी : आंबोलीच्या पायथ्याशी असलेल्या पारपोलीसह केसरी, देवसू गावातील जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याच्या तक्रारी करून आम्हाला जाणीवपूर्वक
काहीजण त्रास देत असून, त्यांच्यावर शिवसेनेने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी लाकूडतोड संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
याबाबतची बैठक काल, मंगळवारी येथील मंंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात पार पडली. यावेळी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत, अशोक दळवी, मंगेश तळवणेकर, बळिराम सावंत, अशोक पवार, दिना कशाळीकर, जयराम सावंत, रघुनाथ सावंत, तानाजी परब, पुरुषोत्तम राऊळ, आबा बंड, अरुण घाडी, संजय राऊळ, तात्या जाधव, अंकुश नाईक, बापू सावंत, आदी यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)
व्यावसायिक संतप्त
यावेळी अनेक लाकूड व्यापाऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. ते बांदा परिसरातून पारपोलीसारख्या गावात येऊन नको ते उद्योग का करीत आहेत, असा सवालही त्यांनी केला.
वस्तुस्थिती मांडू
आम्ही वेगवेगळ्या पक्षांचे असलो, तरी हे कृत्य करणारी व्यक्ती कुठल्या पक्षात काम करते. याचा लेखाजोखा तयार करावा आणि त्याच्यावर कारवाई करावी, असा इशाराही या बैठकीत सर्वांनी दिला आहे. केसरकर यांच्यापुढे वस्तुस्थिती मांडू, असे ते म्हणाले.