मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करा, नारायण राणेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

By सुधीर राणे | Published: June 28, 2024 04:45 PM2024-06-28T16:45:35+5:302024-06-28T16:46:22+5:30

कणकवली: रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे रखडलेले काम गणेशोत्सवापर्यंत पूर्ण व्हावे. तसेच पत्रादेवी ते राजापूर दरम्यान महामार्गावर ...

Complete the stalled four lane work of Mumbai-Goa highway by Ganeshotsav, MP Narayan Rane demand to Union Minister Nitin Gadkari | मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करा, नारायण राणेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करा, नारायण राणेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

कणकवली: रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे रखडलेले काम गणेशोत्सवापर्यंत पूर्ण व्हावे. तसेच पत्रादेवी ते राजापूर दरम्यान महामार्गावर सुशोभीकरण करावे अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन केली. यावेळी प्रलंबित असलेल्या कामासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. 

नारायण राणे यांनी खासदार झाल्यानंतर महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्राधान्याने पूर्णत्वास नेणार असे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चौपदरीकरणाचे काम जलद गतीने पूर्णत्वास नेण्यासंदर्भात मागणी केली. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. हे काम युद्ध पातळीवर पूर्णत्वास न्यावे, यासाठी असणाऱ्या अडचणींवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी या प्रश्नाकडे स्वतः लक्ष घालून रत्नागिरी मधील अपूर्ण असलेले काम पूर्ण करू. तसेच चौपदरीकरणाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही प्रमाणात राहिलेले काम सुद्धा पूर्णत्वास नेले जाईल. पत्रादेवी ते राजापूर पर्यंत रस्ता दुतर्फा सुशोभीकरण कामही सुरू केले जाईल अशी ग्वाही दिली.

Web Title: Complete the stalled four lane work of Mumbai-Goa highway by Ganeshotsav, MP Narayan Rane demand to Union Minister Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.