तडजोडीने कटुता संपते : सोनिया कानशिडे

By admin | Published: December 13, 2014 11:49 PM2014-12-13T23:49:25+5:302014-12-13T23:49:25+5:30

कणकवलीत लोकअदालत : तालुका विधी समितीच्यावतीने आयोजन

Compromise ends bitterness: Sonia Kanshiday | तडजोडीने कटुता संपते : सोनिया कानशिडे

तडजोडीने कटुता संपते : सोनिया कानशिडे

Next

कणकवली : लोकअदालतीमध्ये परस्पर सहमतीने प्रकरण निकाली निघते. त्यामुळे कोणाचा एकाचा विजय आणि दुसऱ्याचा पराभव असे न होता दोघांचेही समाधान होते. त्यामुळे नात्यांमधील कटुता संपते, असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश सोनिया कानशिडे यांनी केले. तालुका विधी सेवा समिती आणि दिवाणी न्यायालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकअदालत उपक्रमांतर्गत आयोजित लोकअदालतीचे कानशिडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी तहसीलदार समीर घारे, पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे, सहाय्यक गटविकास अधिकारी एम.ए.गवंडी, सरकारी वकील कुलकर्णी, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी शरद मगर आदी उपस्थित होते.
जास्तीतजास्त प्रकरणे तडजोडीने निकाली निघावीत यासाठी महालोकअदालत वारंवार आयोजित केली जाते. प्रकरण निकाली लागेपर्यंत बराच वेळ लागत असतो. न्यायालयाच्या प्रक्रियेत एक बाजू हरते तर दुसरी जिंकते. वर्षानुवर्षे प्रकरणे प्रलंबित ठेवण्यापेक्षा वेळेत दोन्ही पक्षांच्या सहमतीने मिटवण्यासाठी लोकअदालत हे माध्यम आहे. न्यायालयात येऊ घातलेली प्रकरणेही लोकअदालतीमधून मिटू शकतात.
तहसीलदार घारे म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी हक्क चळवळ सुरू झाली. घटनेने माणसाला जीवन जगण्याचा हक्क उपभोगण्यासाठी स्वातंत्र्य दिले. व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार होताना इतरांच्या अधिकारांवर गदा येऊ लागली. आपले स्वातंत्र्य उपभोगताना इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. चांगला नागरिक बनून सशक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न पाहिजे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. पी. तानवडे यांनी केले. सहा पॅनेलच्या माध्यमातून लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. (प्रतिनिधी)
वकील संघटनेचा बहिष्कार
कोल्हापूर खंडपीठाच्या निर्मितीसाठी वकील संघटनेने दोन दिवस बंद पुकारण्याबरोबरच राष्ट्रीय लोकअदालतीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे तालुका विधी सेवा समितीच्या सहकार्याने होणारा हा उपक्रम वकिलांच्या अनुपस्थित पार पडला.
विठोबा ताम्हाणेकर यांचा सत्कार
उद्घाटन कार्यक्रमातच ज्येष्ठ नागरिक हरकुळ बुद्रुकचे विठोबा ताम्हाणेकर यांचा सत्कार न्यायाधीश कानशिडे यांच्या हस्ते पुष्प देऊन करण्यात आला.

Web Title: Compromise ends bitterness: Sonia Kanshiday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.