Sindhudurg: न्यायालयीन कोठडीतील सचिन आग्रे याला सशर्थ जामीन मंजूर, अल्पवयीन मुलीला दिली होती धमकी 

By सुधीर राणे | Published: July 4, 2024 03:46 PM2024-07-04T15:46:07+5:302024-07-04T15:47:35+5:30

कणकवली : अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवत प्रेमसंबंध प्रस्थापित करून नंतर तीची छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या ...

Conditional bail granted to Sachin Agre in judicial custody, minor girl was threatened  | Sindhudurg: न्यायालयीन कोठडीतील सचिन आग्रे याला सशर्थ जामीन मंजूर, अल्पवयीन मुलीला दिली होती धमकी 

Sindhudurg: न्यायालयीन कोठडीतील सचिन आग्रे याला सशर्थ जामीन मंजूर, अल्पवयीन मुलीला दिली होती धमकी 

कणकवली: अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवत प्रेमसंबंध प्रस्थापित करून नंतर तीची छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या वैभववाडी तालुक्यातील सचिन सुरेश आग्रे याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश तथा विशेष न्यायाधिश एस. एस. जोशी यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला आहे. 

सन २०२१ मध्ये महाविद्यालयात जाण्यासाठी आरोपीच्या प्रवासी वाहनातून प्रवास करताना निर्माण झालेल्या ओळखीतून आरोपीने अल्पवयीन मुलीशी जवळीक निर्माण केली. त्यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. तसेच साशेल मिडीयाद्वारे चॅटींगही होऊ लागले. दरम्यानच्या कालावधीत प्रेमसंबंधांचा फायदा घेत त्याने तीच्याशी संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोघांच्या घरच्यांना याबाबत कल्पना येताच मुलीच्या पालकांनी आरोपीकडे रितसर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, जात व वयातील अंतराचे कारण देत नकार देण्यात आला. तरीही दोघांमध्ये बोलणे चालू होते.

त्यानंतर आरोपीने त्या मुलीकडे पूर्वीची छायाचित्रे व व्हिडीओची मागणी केली असता त्याला तीने नकार दिला. त्यावरून दोघांत वाद निर्माण झाले. त्यावेळी आरोपीने त्याच्याकडील छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिली. ही बाब मुलीने आपल्या नातेवाईकाला सांगितल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली होती. आरोपी एप्रिल २०२४ पासून न्यायालयीन कोठडीत होता. त्याच्या जामिनावर झालेल्या सुनावणीत ५० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करताना त्या तक्रारदार मुलीच्या गावी जाऊ नये, साक्षीदारांवर दबाव आणू नये आदी अटी घालण्यात आल्या आहेत. आरोपीच्यावतीने एड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

Web Title: Conditional bail granted to Sachin Agre in judicial custody, minor girl was threatened 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.