गोवेरीत काँग्रेसचा झेंडा

By admin | Published: August 7, 2015 11:54 PM2015-08-07T23:54:30+5:302015-08-07T23:54:30+5:30

सरपंचपदी सदफ खुल्ली : सत्यवान गावडे उपसरपंच

Congress flag of Goa | गोवेरीत काँग्रेसचा झेंडा

गोवेरीत काँग्रेसचा झेंडा

Next

कुडाळ : गोवेरी ग्रामपंचायतीवर काँगे्रसचा तिरंगा फडकला असून अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या गोंद्याळ येथील सदफ मुश्ताक खुल्ली या महिलेची सरपंचपदी, तर सत्यवान यशवंत गावडे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.
बुधवारी कुडाळ तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुका झाल्या; पण गोवेरी सरपंच व उपसरपंच पदांकरिता कोणीच ग्रामपंचायत सदस्य बुधवारी ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित न राहिल्याने ही निवडणूक तहकूब करून गुरुवारी घेण्यात आली. त्याप्रमाणे गोवेरी ग्रामपंचायतीची सरपंच, उपसरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. सरपंच म्हणून सदफ मुश्ताक खुल्ली या महिलेची तर उपसरपंचपदी सत्यवान यशवंत गावडे यांची निवड करण्यात आली. यावेळी सोनाली गावडे, सत्यवान हरमलकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

प्रथमच मुस्लिम समाजाला सरपंचपद
एकूण सात सदस्य संख्या असलेल्या गोवेरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सदफ खुल्ली या मुस्लिम समाजाच्या महिलेच्यावतीने प्रथमच मुस्लिम समाजाला गोवेरी गावचे सरपंचपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. खुल्ली यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विकास कुडाळकर, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष रूपेश पावसकर, सरंबळ माजी सरपंच अजय कदम यांनी निवड झालेल्यांचे अभिनंदन केले.

भाजप तालुकाध्यक्षांना धक्का
गोवेरी ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य व भाजपचे विद्यमान कुडाळ तालुकाध्यक्ष बब्रुवान भगत यांनी ही ग्रामपंचायत भाजपकडेच राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, या ग्रामपंचायतीवर काँग्रेसने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करीत भाजप तालुकाध्यक्ष भगत यांना धक्का दिला आहे.

Web Title: Congress flag of Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.