काँग्रेस सदस्यांचा गदारोळ
By admin | Published: February 5, 2015 11:28 PM2015-02-05T23:28:57+5:302015-02-06T00:49:07+5:30
जिल्हा परिषद सभा : आरोंदा जेटीप्रकरणी न्यायालयात जाण्याची मागणी
सिंधुदुर्गनगरी : आरोंदा किरणपाणी जेटी पाहणी दरम्यान घडलेल्या घटनेनंतर स्थायी समिती सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्थायी समितीने या विरोधात न्यायालयात जावे, अशी मागणी करत काँग्रेस सदस्यांनी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत गदारोळ केला. मात्र, संबंधित प्रकरणात स्थायी समितीवर गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत, असे स्पष्ट करत संबंधित गुन्हे वैयक्तिक असल्याने स्थायी समितीला न्यायालयात जाता येणार नाही, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी स्पष्ट केले. तर शिवसेना सदस्यांनी न्यायालयात जाण्यासंदर्भातील ठरावाला विरोध केला.
जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, उपाध्यक्ष रणजित देसाई, सभापती गुरुनाथ पेडणेकर, संजय बोंबडी, स्नेहलता चोरगे, अंकुश जाधव, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यात विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली आहेत. त्यावर लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.
त्याठिकाणी पाण्याची सोय नाही. त्यामुळे ही शौचालयाची कामे केवळ उद्दिष्टपूर्तीसाठी करण्यात आली आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी, (पान ८ वर)
बागायतदारांना वीज कंपनीने नुकसानभरपाई द्यावी
जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठमोठ्या बागायतीवरून विद्युत वाहिन्या गेल्या आहेत. त्यामुळे तारांच्या घर्षणामुळे बागांना वणवा लागून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच बागायतीवरील विद्युत वाहिन्यांना प्लास्टिक गार्ड बसविण्यात यावेत, अन्यथा वीज वाहिन्या स्थलांतरित कराव्यात, अशी मागणी सभेत सदस्यांनी केली.