दोडामार्गात काँगे्रसचा ‘दे धक्का’

By admin | Published: November 24, 2015 11:42 PM2015-11-24T23:42:09+5:302015-11-25T00:41:39+5:30

नानचे नगराध्यक्ष : कोरगावकर उपनगराध्यक्षा; भाजपची निराशा

Congress' 'push push' by Doda | दोडामार्गात काँगे्रसचा ‘दे धक्का’

दोडामार्गात काँगे्रसचा ‘दे धक्का’

Next

दोडामार्ग : कसई-दोडामार्ग नगरपंचायतीत संख्याबळ कमी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सेना, भाजप व मनसेच्या प्रत्येकी एका सदस्याला हाताशी धरून ‘वन टू का फोर’ करत नाट्यमयरित्या सत्ता स्थापन केली. नगराध्यक्षपदी काँगे्रसचे संतोष नानचे, तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या साक्षी कोरगावकर यांची निवड झाली.
या निवडणुकीत भाजप पहिल्यांदा आपल्याच पक्षाचा नगराध्यक्ष निवड करण्यासाठी मनसुबे रचत होता. पण काँग्रेसच्या डावपेचात भाजपची घोर निराशा झाली.
कसई-दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत काँगे्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे १७ पैकी ६ नगरसेवक निवडून आले होते. तर सेना-भाजपचे प्रत्येकी ५ प्रमाणे १० संख्याबळ नगरपंचायतीत होते. मनसेचा एकमेव नगरसेवक निवडून आला होता. युतीचे १० संख्याबळ असल्याने याठिकाणी युतीचा नगराध्यक्ष बसेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ऐनवेळी शिवसेनेच्या नगरसेविका संध्या प्रसादी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांच्या नाराजीचा फायदा काँग्रेसला मिळेल, असा अंदाज वर्तविला जात होता आणि त्यानंतरच राजकीय समीकरणे बदलली. संध्या प्रसादी, भाजपच्या नगरसेविका रेश्मा कोरगावकर व मनसेचे नगरसेवक रामचंद्र ठाकूर हे काँग्रेसच्या गळाला लागले. हे तीन व आघाडीचे सहा असे नऊ नगरसेवक सोमवारी रात्री अज्ञातवासात होते. ते मंगळवारी थेट निवडणुकीसाठी दाखल झाले. (प्रतिनिधी)

वैभववाडी नगराध्यक्षपदी रावराणे
वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे रवींद्र्र रावराणे विराजमान झाले. त्यांनी शिवसेनेचे रोहन रावराणे यांचा एका मताने पराभव केला. तर भाजपच्या सुचित्रा कदम यांना पराभूत करत काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय चव्हाण उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले. दोन्ही निवडी अपेक्षेप्रमाणे झाल्याने काँग्रेसने आतषबाजी केली.


राज्यातील
अनोखे उदाहरण
दोडामार्ग नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे संतोष नानचे मंगळवारी विराजमान झाले. नानचे हे काँग्रेसचे नगराध्यक्ष असले तरी त्यांना राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि मनसे या प्रमुख चार पक्षांचा पाठिंबा लाभला आहे. यात भाजप व सेनेच्या प्रत्येकी एका बंडखोर सदस्याने नानचे यांना मतदान केल्यामुळे सर्वपक्षीय पाठिंब्यावर नगराध्यक्ष झाल्याचे हे अनोखे उदाहरण बनले आहे.

Web Title: Congress' 'push push' by Doda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.