प्लास्टिक मुक्तीवर सावंतवाडीत एकमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 09:07 PM2017-10-07T21:07:20+5:302017-10-07T23:20:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सावंतवाडी : ह्यस्वच्छ शहर, सुंदर शहरह्ण अशी ओळख असलेल्या सावंतवाडी शहरात अखेर प्लास्टिकमुक्ती करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. नगरपालिका व व्यापारी यांनी संयुक्तपणे हा निर्णय घेतल्याने आता सावंतवाडी शहर प्लास्टिकमुक्त होणार आहे. याबाबतची बैठक शुक्रवारी सकाळी नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, सभापती आनंद नेवगी, व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांच्यासह बाळ बोर्डेकर, रंजू रेडकर, रवी स्वार, वल्लभ नेवगी, प्रेमानंद देसाई, संजू शिरोडकर, हेमंत मुंज, शिरी डुबळे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रथम नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्वच्छ शहराबाबत माहिती दिली. मोती तलावाचे वरदान लाभलेले सावंतवाडी शहर आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन शहर सुंदरतेचा ध्यास घेतला पाहिजे. अनेक बाहेरचे पर्यटक सावंतवाडीत आल्यानंतर ते शहराच्या स्वच्छतेबाबत कौतुक करत असतात. त्यामुळे सर्वांना एक ऊर्जा मिळत असते. तुमच्या इच्छाशक्तीवरच आम्ही शहर स्वच्छतेबाबत नेहमी पुढाकार घेत असतो. त्यामुळे आता प्लास्टिकमुक्ती करून एक नवीन संदेश महाराष्ट्राला देऊया, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले.
मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांनी प्लास्टिकमुक्ती होणे गरजेचे आहे. त्यासाठी पालिका व्यापाºयांना सर्व ते सहकार्य करेल, असे सांगितले. तुम्हीही आम्हांला सहकार्य करा. प्रत्येक वस्तूला पर्याय असतो. त्याचा वापर फक्त आपण करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावर व्यापाºयांच्यावतीने अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी सांगितले की, शहरातील व्यापारी हे प्लास्टिकमुक्तीसाठी कटीबध्द आहेत. त्यांच्याही काही समस्या होत्या. त्यावर उपाययोजना करण्यात आली आहे. तसेच आपण जेव्हा एक वस्तू बंद करतो तेव्हा त्यावर उपाययोजना झाल्या पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.
वल्लभ नेवगी यांनी शहरात प्लास्टिकमुक्ती होणे गरजेचे आहे. सर्व व्यापारी त्याची अंमलबजावणी करतील. पण व्यापारीवर्गात समाजप्रबोधन झाले पाहिजे. यासाठी कार्यशाळा घ्या, असे सांगितले. तसेच बाहेरून येणाºया व्यापाºयांनाही प्लास्टिक आणू नये यासाठी कायमस्वरूपी बंदी घाला, अशी सूचना नेवगी यांनी केली.
नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सर्व व्यापारीवर्गाने एकमताने प्लास्टिकमुक्तीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच यापूर्वी पालिकेने जी कारवाई केली ती व्यापारीवर्गात शिस्त यावी यासाठी केली. आम्हांला कधीही आपल्याच व्यापाºयांना त्रास व्हावा अशी इच्छा नाही, असे स्पष्ट केले. तसेच पालिकेने प्लास्टिकबंदी झाल्यानंतर कोणत्या प्रकारच्या पिशव्या वापराव्यात याचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखविले.
सावंतवाडी नगरपालिकेने प्लास्टिकमुक्तीबाबत व्यापाºयांची बैठक आयोजित केली होती. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.