मुंबई-गोवा महामार्गाची बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण करणार पाहणी, आमदार वैभव नाईकांची माहिती

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 22, 2022 12:15 PM2022-08-22T12:15:06+5:302022-08-22T12:16:02+5:30

मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहामध्ये आज, सोमवारी सकाळी कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींची एक विशेष बैठक झाली

Construction Minister Ravindra Chavan will inspect the Mumbai Goa highway, informed MLA Vaibhav Naik | मुंबई-गोवा महामार्गाची बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण करणार पाहणी, आमदार वैभव नाईकांची माहिती

मुंबई-गोवा महामार्गाची बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण करणार पाहणी, आमदार वैभव नाईकांची माहिती

Next

सिंधुदुर्ग : गणेश चतुर्थीच्या पूर्वी मुंबई-गोवामहामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करा असे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच २६ ऑगस्ट रोजी ते मुंबई-गोवामहामार्गाची पाहणी करणार असल्‍याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहामध्ये आज, सोमवारी सकाळी कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींची एक विशेष बैठक झाली. यात मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत प्रामुख्याने चर्चा झाली. या बैठकीला शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार शेखर निकम, आदिती तटकरे, अनिकेत तटकरे, साळुंखे सचिव रस्ते, मुख्य अभियंता, सा. बांधकाम, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता छाया नाईक, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, आर.टी. ओ. अधिकारी आदी उपस्थित होते.

या बैठकीत आमदार वैभव नाईक यांनी गगनबावडा घाट रस्त्याच्या वारंवार निर्माण होणाऱ्या समस्येबाबत लक्ष वेधले. मुंबई गोवा-महामार्ग चौपदरीकरणाच्या अपूर्ण कामांकडेही त्यांनी लक्ष वेधले. तर आमदार नितेश राणे यांनी भुईबावडा, गगनबावडा घाट वारंवार कोसळत असल्याने बंद होणारे रस्ते यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्याची मागणी केली.

महामार्गाच्या प्रलंबित कामाबाबत लक्ष वेधत तसेच ज्या ठिकाणी महामार्गावर अपघात सदृश्य जागा आहेत त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी वाहनधारकांना सूचना मिळण्याकरिता ब्लींकर्स लावण्याची ही मागणी करण्यात आली. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणातील या सर्वच लोकप्रतिनिधींच्या सूचनाबाबत तत्काळ गांभीर्याने उपाययोजना करण्याची आदेश दिले आहेत. तसेच २६ ऑगस्टला ते महामार्गाची पाहणी करणार असल्‍याचे नाईक म्‍हणाले.

Web Title: Construction Minister Ravindra Chavan will inspect the Mumbai Goa highway, informed MLA Vaibhav Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.