बांधकाम मंत्र्याच्या सासूरवाडीची ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे, सरपंच पदासह नऊ सदस्य विजयी
By अनंत खं.जाधव | Published: December 20, 2022 05:30 PM2022-12-20T17:30:54+5:302022-12-20T17:33:38+5:30
सावंतवाडी तालुक्यातील निवडे ग्रामपंचायत गेली अनेक वर्षे भाजपची सत्ता होती.
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील नेमळे ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गटाने वर्चस्व मिळवले आहे. ही ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सासुरवाडीची असल्याने या ग्रामपंचायतीवर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र ठाकरे गटाने गेली अनेक वर्षे भाजपची असलेली सत्ता घालवून आपला झेंडा रोवला आहे. यात सरपंच पदी दीपिका बेहेरे यांच्यासह नऊ सदस्य ठाकरे गटाचे निवडून आले आहेत.
सावंतवाडी तालुक्यातील निवडे ग्रामपंचायत गेली अनेक वर्षे भाजपची सत्ता होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे मेव्हणे विनोद राऊळ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने गेले अनेक वर्षे या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा रोवला होता. मात्र यावेळी निवडणुकीत शिवसेनेने या ग्रामपंचायत वर आपला झेंडा फडकवला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना हा धक्काच मानला जातो शिवसेनेचे सरपंच दीपिका बेहेरे यांच्यासह नऊ सदस्य निवडून आले आहेत.