बांधकाम अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By admin | Published: October 18, 2016 11:45 PM2016-10-18T23:45:12+5:302016-10-18T23:45:12+5:30

दोडामार्ग तालुक्यात रस्त्यांची दयनीय अवस्था : शिवसेना-भाजपचे पदाधिकारी आक्रमक

The construction officers caught Dharevar | बांधकाम अधिकाऱ्यांना धरले धारेवर

बांधकाम अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Next

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यांतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची वस्तुस्थिती नाकारणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतले.‘तुमच्यासारख्या नाकर्त्या आधिकाऱ्यांमुळेच सरकारची बदनामी होत असल्याचा आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनी केला. येत्या सोमवारपर्यंत रस्त्यावर पडलेले सर्व खड्डे न बुजविल्यास कार्यालयातच ठाण मांडून बसू, असा इशारा सनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मात्र, ते बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य वाहनचालकांना बसतो आहे.
खतीब यांच्या पत्राबाबत याबाबतची माहिती सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक दिली. यावेळी बाबा खतीब, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, सेनेचे तालुकाप्रमुख धुरी, भगवान गवस, खुशाली शेटकर, प्रवीण गवस आदींनी शाखा अभियंता अशोक बेहरे यांना धारेवर धरत याबाबत जाब विचारला. तसेच अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाबाबत चांगलेच खडे बोल सुनावले. येत्या सोमवारपर्यंत जर खड्डे बुजविले नाहीत, तर कार्यालयातच ठाण मांडून बसू, असा इशारा यावेळी म्हापसेकर व धुरी यांनी दिला. (प्रतिनिधी)


वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न
दोडामार्ग-तिलारी रस्त्यावर झरेबांबर विमानतळ येथे रस्ता उखडण्यात आला आहे. त्याला अनेक महिने झाले, तरी तो पूर्ववत करण्यात न आल्याने अपघात होऊन अनेकजण जखमी झाले. पण तरीदेखील खड्डा बुजविण्याची बुध्दी बांधकामच्या अधिकाऱ्यांना झाली नाही. त्यामुळे साटेली भेडशी येथील बाबा खतीब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच थेट पत्र पाठवून तक्रार केली होती. याबातचे वृत्त स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आले. मात्र, खतीब हे दिशाभूल करीत असून, दोडामार्ग-तिलारी रस्त्यावर एकही खड्डा नाही. शिवाय तालुक्यातही अशी परिस्थिती नाही, असे सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी सांगून वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न केला.

Web Title: The construction officers caught Dharevar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.