कडवईत मत्स्य उत्पादन प्रकल्प सुरू

By admin | Published: March 30, 2015 10:34 PM2015-03-30T22:34:43+5:302015-03-31T00:19:48+5:30

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. हुकमसिंंग धाकड उपस्थित होते.वापरात नसलेल्या नैसर्गिक जलाशयांचा उपयोग मत्स्य संवर्धनासाठी केला तर राज्याच्या मत्स्योत्पादनात वाढ होऊन

Continuous Fishery Production Project | कडवईत मत्स्य उत्पादन प्रकल्प सुरू

कडवईत मत्स्य उत्पादन प्रकल्प सुरू

Next

रत्नागिरी : कडवई जलाशयात पिंंजऱ्यातील मत्स्य बोटुकली उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राघवेंद्र पै यांचे हस्ते झाले. यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. हुकमसिंंग धाकड उपस्थित होते.वापरात नसलेल्या नैसर्गिक जलाशयांचा उपयोग मत्स्य संवर्धनासाठी केला तर राज्याच्या मत्स्योत्पादनात वाढ होऊन ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, या उद्देशाने राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, मंत्रालय, मुंबई यांच्या अर्थसाह्याने सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी यांच्यातर्फे जलाशयातील पिंंजरा मत्स्यसंवर्धन आणि व्यवस्थापन प्रकल्प राबवला जात आहे. डॉ. बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कडवई (ता. संगमेश्वर) येथे बेरोजगार युवकांचा स्वयं सहाय्यता बचत गट स्थापन करून प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. राज्यातील हा दुसरा प्रकल्प आहे. प्रकल्पप्रमुख डॉ. बाळासाहेब चव्हाण यांनी प्रस्ताविकामध्ये प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील थेरवडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयं सहाय्यता बचत गटाने गावाजवळील पळसवाडा तलावामध्ये शास्त्रीय पध्दतीने पिंंजऱ्यातील मत्स्य संवर्धनाला सुरूवात केल्याचे सांगितले.
यावेळी विभागप्रमुख डॉ. सुधाकर इंदुलकर, अहमदनगर जिल्ह्यातील थेरवडी येथील बबन थोरात उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Continuous Fishery Production Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.