बांधकाम साहित्य टाकून ठेकेदाराचे पलायन...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 04:05 PM2019-03-18T16:05:25+5:302019-03-18T16:06:10+5:30
वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड-वरचे बांबर येथील नव्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या बाबत जाब विचारल्या नंतर ठेकेदाराने रातो-रात कामाचे साहित्य पळवून नेले त्यामुळे अशा ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे अशी मागणी येथिल ग्रामस्थांनी उपकार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांच्याकडे केली आहे.
सावंतवाडी : वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड-वरचे बांबर येथील नव्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या बाबत जाब विचारल्या नंतर ठेकेदाराने रातो-रात कामाचे साहित्य पळवून नेले त्यामुळे अशा ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे अशी मागणी येथिल ग्रामस्थांनी उपकार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांच्याकडे केली आहे.
येथील वरचे-बांबर रस्त्याच्या कामला १० दिवसांपूर्वी सुरवात करण्यात आली होती. मात्र हे काम निकृष्ठ दर्जाने होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर १३ मार्चला ग्रामस्थांनी हे काम थांबले होते. या संबंधी संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी या मागणी साठी आज ग्रामस्थांसह शिवसेना-मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत बांधकाम विभागाला घेराव घातला.
यावेळी वेंगुर्ले पंचायत समिती माजी उपसभापती बाळू परब, मातोंड सरपंच जानवी परब, उपसरपंच सुभाष सावंत, ग्रामपंचायत सदस्य अस्मिता परब, सीताराम जाधव, तुकाराम परब, राहुल परब, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर मनसे तालुकाध्यक्ष विजय सावंत, मनसेचे परशुराम परब, बाळा दळवी, उपविभागीय अधिकारी अनिल निकम, शशिकांत परब आदी उपस्थित होते.