सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील कंत्राटी कर्मचारी आज पासून संपावर, जन्म-मृत्यूच्या दाखल्यासह ४० सेवा खोळंबल्या!

By सुधीर राणे | Published: February 27, 2023 04:14 PM2023-02-27T16:14:08+5:302023-02-27T16:15:04+5:30

१ मार्च पासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार

Contractual employees in village panchayats of Sindhudurg district are on strike from today, 40 services along with birth and death certificates have been disrupted | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील कंत्राटी कर्मचारी आज पासून संपावर, जन्म-मृत्यूच्या दाखल्यासह ४० सेवा खोळंबल्या!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील कंत्राटी कर्मचारी आज पासून संपावर, जन्म-मृत्यूच्या दाखल्यासह ४० सेवा खोळंबल्या!

googlenewsNext

मनोज वारंग

ओरोस (सिंधुदुर्ग) :आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये संगणक परिचालक म्हणून काम करणारे कंत्राटी कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून  (२७ फेब्रुवारी) संपावर गेले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीत ऑनलाइन होणारी ४० प्रकरची कामे खोळंबली आहेत. यात जन्म मृत्यू दाखल्यांचाही समावेश आहे. तसेच हे कर्मचारी १ मार्च पासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४३१ ग्रामपंचायती आहेत. शासनाच्या योजनेनुसार ग्रामपंचायतीमध्ये ऑनलाइन कामासाठी आपले सेवा केंद्र सुरू आहे. या केंद्रांच्या माध्यमातून जन्म मृत्यू प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, निराधार योजनेच्या कामासह चाळीशीहून अधिक कामे केली जातात. परिचालकांना सात हजार रुपये मानधन दिले जाते. ते सरकारी कामे करीत असल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, किमान वेतन मिळावे आदी मागण्या संगणक परिचालकांच्या आहेत. या संदर्भात राज्य शासनाने यावलकर समिती नियुक्त केली होती. त्यांनी २०१८ मध्ये अहवाल दिला होता. त्यातही या कर्मचाऱ्यांना ग्रा.पं. कर्मचाऱ्याचा दर्जा व किमान वेतन द्यावे व त्यानुसार आकृतीबंध तयार करावा, अशी शिफारस केली होती, पण त्यावर अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही आंदोलने केली.

२०२१ मध्ये तत्कालीन ग्रामविकास मंत्र्यांनी मागणी मान्य करण्याचे लेखी आश्वासनही दिले होते. मात्र अद्याप कुठलाही निर्णय नाही. २०२२ मध्ये नागपूर हिवाळी अधिवेशन काळातही संघटनेने आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते. पण त्यानंतरही शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे २७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

तसेच १ मार्च पासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष सुहास मिठबावकर, मोतीराम वळंजू, जनार्दन लोरेकर, तुषार हडशी आदी संगणक परिचालक उपस्थित होते.

Web Title: Contractual employees in village panchayats of Sindhudurg district are on strike from today, 40 services along with birth and death certificates have been disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.