जाळी तोडून चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 06:17 PM2019-09-18T18:17:43+5:302019-09-18T18:18:43+5:30

सर्जेकोट येथील कृष्णा चंद्रकांत आचरेकर यांनी समुद्रात मासेमारीसाठी टाकलेल्या २४ पैकी सुमारे एक लाख रुपये किमतीच्या २२ जाळी तोडून ती चोरून नेल्याप्रकरणी एका ट्रॉलरवरील अज्ञात व्यक्तींविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Convicted of breaking a net and stealing | जाळी तोडून चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल

जाळी तोडून चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देजाळी तोडून चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखलट्रॉलरवरील अज्ञात व्यक्तींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा

मालवण : सर्जेकोट येथील कृष्णा चंद्रकांत आचरेकर यांनी समुद्रात मासेमारीसाठी टाकलेल्या २४ पैकी सुमारे एक लाख रुपये किमतीच्या २२ जाळी तोडून ती चोरून नेल्याप्रकरणी एका ट्रॉलरवरील अज्ञात व्यक्तींविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्जेकोट येथील कृष्णा आचरेकर हे १३ सप्टेंबरला सर्जेकोट येथील समुद्रात आपल्या स्वामी समर्थ नौकेने मासेमारीस गेले होते. १४ सप्टेंबरला मध्यरात्री त्यांनी अकरा वावात मासेमारीसाठी २४ जाळी समुद्रात टाकली होती. याच परिसरात मासेमारी करणाऱ्या एका ट्रॉलर्सने ही २४ जाळी तोडली. यातील दोन जाळी ओढण्यात आचरेकर यांना यश आले तर सुमारे एक लाख रुपये किमतीची २२ जाळी त्या ट्रॉलरवरील अज्ञातांनी ट्रॉलरमध्ये ओढत चोरून नेल्या.

त्या ट्रॉलरवर रोक्कू (२) असा उल्लेख आहे अशी तक्रार आचरेकर यांनी मंगळवारी येथील पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत पेडणेकर, संतोष गलोले हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Convicted of breaking a net and stealing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.