कोर्ले-सातंडी मध्यम प्रकल्प भरला, दमदार पावसाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 04:38 PM2019-07-02T16:38:32+5:302019-07-02T16:39:50+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे. गेले चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे देवगड तालुक्यातील कोर्ले- सातंडी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला असून या प्रकल्पातून ३.५० घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या प्रकल्पात २५.५६४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील माडखोल लघु पाटबंधारे प्रकल्पही भरला असून या प्रकल्पात १.६९०० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. सावंतवाडी तालुक्यातील माडखोल लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून त्यातून २२.३१ घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आंबोली, सनमटेंब व पावशी लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये ६० टक्के पाणीसाठा झाला आहे.
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे. गेले चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे देवगड तालुक्यातील कोर्ले- सातंडी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला असून या प्रकल्पातून ३.५० घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या प्रकल्पात २५.५६४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे.
जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील माडखोल लघु पाटबंधारे प्रकल्पही भरला असून या प्रकल्पात १.६९०० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे.
सावंतवाडी तालुक्यातील माडखोल लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून त्यातून २२.३१ घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आंबोली, सनमटेंब व पावशी लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये ६० टक्के पाणीसाठा झाला आहे.
सिंधुदुर्गातील प्रकल्पनिहाय झालेला पाणीसाठा पुढीलप्रमाणे असून सर्व आकडे दशलक्ष घनमीटर परिमाणात आहेत. कंसातील आकडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत.
तिलारी आंतरराज्य प्रकल्प १२६.०२७० (६४.२०), देवघर ३२.६६७० (८९), लघु पाटबंधारे प्रकल्प - शिवडाव -१.०७३६ (१७४), नाधवडे - १.४९१० (१६०), ओटव - १.६०७८ (१६०), देंदोनवाडी - १.००४० (१७४), तरंदळे - ०.२७५० (१६२), आडेली - ०.३८६० (निरंक), आंबोली - १.१२०० (१९५), चोरगेवाडी - ०.९६७० (निरंक), हातेरी -१.११७० (निरंक), निळेली - ०.६७०० (निरंक), ओरोस बुद्रुक - ०.०८०० (निरंक), सनमटेंब - १.४४४० (१५७), तळेवाडी डिगस, - ०.३८०० (निरंक), दाभाचीवाडी - ०.५९१० (निरंक), पावशी - १.८२९० (१७५), शिरवल - ०.६०७० (निरंक), पुळास - ०.४७७० (निरंक), वाफोली - ०.३६६० (निरंक), कारिवडे - ०.२०१० (निरंक). धामापूर - १.१९१० (निरंक), हरकुळ - १.३८४० (७५), ओसरगाव - ०.०७९० (निरंक), ओझरम - ०.३५३० (निरंक), पोईप - १.१६३० (निरंक), शिरगांव - ०.०६१० (१४०), तिथवली - ०.४५७० (१२०), लोरे - १.४१०० (निरंक).
सरासरी ९00 मिलीमीटर पावसाची नोंद
मागील चार दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी काहीशी विश्रांती घेतली. पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत होत्या. जिल्ह्यात मागील चोवीस तासात जिल्ह्यात ६९.२५ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला असून १ जूनपासून आतापर्यंत ८९९.१५ मिलीमीटर सरासरी एकूण पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या चोवीस तासात तालुकानिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाची आहे. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत.
दोडामार्ग ६५ (९४२), सावंतवाडी ७० (६३८), वेंगुर्ले ३७ (१००८.२४), कुडाळ ४० (८१०), मालवण २७ (९३७), कणकवली १४५ (९९०), देवगड ८७ (९२७), वैभववाडी ८३ (९४१) असा पाऊस झाला आहे.