corona cases in sindhudurg : वेंगुर्लेत ६ ते १५ मे पर्यंत जनता कर्फ्यु जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 07:21 PM2021-05-04T19:21:04+5:302021-05-04T19:54:52+5:30
CoronaVirus Vengurla Sindhudurg : कोरोना संक्रमणाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत ६ ते १५ मे या कालावधीत जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय आमदार दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
वेंगुर्ला : कोरोना संक्रमणाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत ६ ते १५ मे या कालावधीत जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय आमदार दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
👉वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले तहसील कार्यालयात आज मंगळवारी आमदार दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर,तहसीलदार प्रवीण लोकरे,पोलिस निरीक्षक तानाजी मोरे, गटविकास अधिकारी उमा पाटील, मुख्याधिकारी डॉ अमितकुमार सोंडगे, तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर, डॉ अतुल मुळे,नगरसेवक सुहास गवंडळकर,नगरसेवक विधाता सावंत,वेंगुर्ले व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर,उपाध्यक्ष राजीव पांगम,शिरोडा व्यापारी संघाचे अध्यक्ष राजन शिरोडकर यांच्यासह सर्व पक्षांचे तालुकाप्रमुख, सरपंच, व्यापारी उपस्थित होते.
जनता कर्फ्यु मध्ये ६ मे ते १५ मे पर्यंत या १० दिवसांसाठी फक्त सकाळी ६ ते ९ या वेळेत फक्त दूध विक्री,पेट्रोल डिझेल व आंबा विक्री सुरू राहील.तर इतरत्र बाजारपेठ बंद राहुन फक्त घरपोच सेवा सुरू राहील.ट्रान्सपोर्ट, बांधकाम व इंडस्ट्रीज सुरू असतील.शेती विषयिक कामे करणेसाठी सुट दिली आहे.👉गोव्याहून कामा निमित्त ये जा करण्याऱ्या व्यक्तींनी चेकपोस्टचे नियम पाळून ये जा करता येईल.मात्र त्यांना १५ दिवसांनी टेस्ट करणे आवश्यक राहील.
मासे,मटण,चिकण इत्यादी दुकाने बंद राहतील.भाजीपाला विक्री बंद राहील.पण गरजू भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यक्तींची यादी नगरपालिके मार्फत करण्यात येईल.व त्यांना अत्यावश्यक बाबींची पॅकेड देवून मदत करण्यात येईल.तर मेडीकलचे कारण सांगून बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्याकडे बील असणे आवश्यक आहे.ज्या बिलांवर वेळ व दिनांक नमुद असेल.
शेतकऱ्यांनी त्यांना आवश्यक शेती विषयक साहित्य पुढील एक दिवसात खरेदी करावे. त्यानंतर होम डिलीव्हरी येईल. शहरात व तालुक्यात ठिकठिकाणी पोलिसांमार्फत नाकाबंदी करण्यात येऊन,विनाकारण फिरणाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येईल.तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.