Corona vaccine : जिल्ह्यात नऊ हजार लस झाल्या उपलब्ध : प्रजित नायर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:03 PM2021-06-23T16:03:34+5:302021-06-23T16:06:18+5:30
Corona vaccine : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना पहिल्या आणि दुसऱ्या डोस साठी कोव्हक्सीन ४ हजार. , आणि कोवीशील्ड ५ हजार अशी एकुण ९००० लस उपलब्ध झाली आहे .ही लस जिल्ह्यातील ९६ केंद्रांवर उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यांना पहिला किंवा दुसरा डोस घ्यायचा आहे त्यांनी नजीकच्या केंद्रांवर लस घ्यावी. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना पहिल्या आणि दुसऱ्या डोस साठी कोव्हक्सीन ४ हजार. , आणि कोवीशील्ड ५ हजार अशी एकुण ९००० लस उपलब्ध झाली आहे .ही लस जिल्ह्यातील ९६ केंद्रांवर उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यांना पहिला किंवा दुसरा डोस घ्यायचा आहे त्यांनी नजीकच्या केंद्रांवर लस घ्यावी. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.
केंद्र सरकारने २१ जूनपासून देशात आणि राज्या-राज्यात कोरोना लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार १८ ते ४४ वयोगटातील व त्यापुढील गटासाठी जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होऊ लागली असून आज ४००० कोव्हकसीन आणि ५००० कोवोशील्ड अशी एकूण ९००० लस उपलब्ध झाली आहे.
जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील व त्या पुढील गटासाठी मोठ्या प्रमाणात लस आवश्यक आहे. आतापर्यंत आरोग्य सेवक, फ्रंट वर्कर कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक अशा नागरिकांना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ४२ हजार ८१० जणांना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. त्यात १८ ते ४४ वयोगटातील व त्यापुढील ४५ वयोगटावरील व्यक्तीना ही लस देण्यात आली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर लसींचा डोस घ्यावा
जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी आज जिल्ह्यातील ९६ लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध झाली आहे.
ज्या व्यक्तींना पहिला किंवा दुसरा डोस घेणे आवश्यक आहे त्यानी आपल्या नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उप जिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय यासह प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर लसींचा डोस घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.