CoronaVirus News: सिंधुदुर्गात ट्रुनॅट मशिनद्वारे कोरोना तपासणी कार्यान्वित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 05:17 PM2020-06-09T17:17:47+5:302020-06-09T17:22:49+5:30

जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रुनॅट मशिनद्वारे स्वॅब तपासणीची इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दिल्ली (आयसीएमआर) कडून परवानगी देण्यात आली आहे.

Corona inspection carried out by Trunat machine at Sindhudurg | CoronaVirus News: सिंधुदुर्गात ट्रुनॅट मशिनद्वारे कोरोना तपासणी कार्यान्वित

CoronaVirus News: सिंधुदुर्गात ट्रुनॅट मशिनद्वारे कोरोना तपासणी कार्यान्वित

Next

कणकवली- जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रुनॅट मशिनद्वारे कोरोनाची तपासणी सुरू झाली आहे. आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, रेण्विय निदान प्रयोगशाळेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उल्हास लोखंडे, डॉ. पी.एम. मोरे व तंत्रज्ञ परब यांच्या उपस्थितीत यंत्र सामुग्रीची पाहणी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रुनॅट मशिनद्वारे स्वॅब तपासणीची इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दिल्ली (आयसीएमआर) कडून परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सध्या ट्रुनॅट एक मशीन व सिबी नॅट कोरोना एक, अशा दोन तपासणी मशीन उपलब्ध आहेत.

या दोन्ही मशिनद्वारे एका तासात दोन तपासणी होऊ शकतात. ट्रुनॅट मशीनद्वारे स्वॅब तपासल्यानंतर याची स्क्रीनिंग टेस्ट होऊन निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह स्वॅब रिपोर्ट मिळतो. जर निगेटिव्ह रिपोर्ट असेल तर तो कन्फर्म रिपोर्ट असतो तर पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर हा रिपोर्ट कन्फर्म करण्यासाठी  सीबीनॅट मशिन किंवा आरटीपीसीआर मशीनमध्ये तपासणीसाठी पाठवणे आवश्यक असते. या दोन्ही मशिनद्वारे स्वॅब टेस्टिंग सुरू करण्यात आली आहे. तसेच त्यासाठीचे प्रशिक्षण एन. आय. बी. पुणे यांचेकडून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

याचवेळी जिल्ह्यातील बहुप्रतिक्षीत माकड तापाचे (के.एफ.डी.) निदान करणारी प्रयोगशाळाही कार्यान्वित झालेली आहे. यापूर्वी माकड ताप नमुने तपासणीसाठी एन.आय.बी.पुणे किंवा मनीपाल रुग्णालय, गोवा यांच्याकडे पाठविण्यात येत होते. आता ही लॅब कार्यान्वित झाल्यामुळे हे नमुने स्थानिक पातळीवर तपासता येणार आहेत. तसेच या लॅबमध्ये लॅप्टोस्पारोसिस, डेंग्यू आणि चिकुनगुनिया या आजारांची तपासणी करता येणार आहे. यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचे प्रशिक्षण एन.आय.बी.पुणे कडून झाले आहे. तसेच लागणारे इतर मशिन्स लवकरच प्राप्त होणार आहेत.

Web Title: Corona inspection carried out by Trunat machine at Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.