corona in sindhudurg-रुग्णाच्या संपर्कात ४0 व्यक्ती :  के. मंजुलक्ष्मी यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 04:20 PM2020-05-26T16:20:12+5:302020-05-26T16:22:04+5:30

कुडाळ तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून संपर्कात एकूण ४० व्यक्ती आल्या आहेत. त्यातील ३० व्यक्ती अतिजोखमीच्या संपर्कातील असून १० व्यक्ती कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत.

corona in sindhudurg- 40 persons in contact with the patient: K. Information of Manjulakshmi | corona in sindhudurg-रुग्णाच्या संपर्कात ४0 व्यक्ती :  के. मंजुलक्ष्मी यांची माहिती

corona in sindhudurg-रुग्णाच्या संपर्कात ४0 व्यक्ती :  के. मंजुलक्ष्मी यांची माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णाच्या संपर्कात ४0 व्यक्ती :  के. मंजुलक्ष्मी यांची माहिती कुडाळ तालुक्यातील बाधित महिला; ३0 अतिजोखमीच्या, १0 कमी जोखमीच्या

सिंधुदुर्गनगरी : कुडाळ तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून संपर्कात एकूण ४० व्यक्ती आल्या आहेत. त्यातील ३० व्यक्ती अतिजोखमीच्या संपर्कातील असून १० व्यक्ती कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत.

अतिजोखमीच्या संपर्कातील १३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर आणखी १७ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात येत आहेत. सोमवारी एकूण ११ अहवाल कोल्हापूर येथील तपासणी लॅबकडून प्राप्त झाले असून हे सर्वच्या सर्व ११ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात सध्या ४ कंटेन्मेंट झोन आहेत. त्यात कणकवली तालुक्यातील डामरे, वैभववाडी तालुक्यातील नाधवडे, मालवण तालुक्यातील हिवाळे आणि कुडाळ तालुक्यातील पणदूर या गावांचा समावेश आहे. पणदूर या नवीन कंटेन्मेंट झोनमध्ये पणदूर, हुमरमळा, अणाव या तीन गावांचा समावेश आहे. या कंटेन्मेंट झोनमध्ये २८२ कुटुंबांतील १ हजार ३४१ व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात एकूण २२ हजार ८ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्यापैकी ३९८ व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. तर गावपातळीवर २१ हजार ६१० व्यक्तींना गावपातळीवरील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण १ हजार ४३५ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी १ हजार १५१ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील १७ अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित १ हजार १३४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून २८४ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या ८७ रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, ३० रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल आहेत.

आरोग्य यंत्रणेमार्फत सोमवारी ४ हजार १८० व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण १७ कोरोना बाधित रुग्णांपैकी ७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या १० रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ मे २०२० पासून सोमवार अखेर एकूण ४० हजार ५२७ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.

३00 परप्रांतीय कामगार बिहारकडे रवाना

कुडाळ तालुक्यात असलेल्या बिहार येथील सुमारे ३०० परप्रांतीय कामगारांना श्रमिक एक्स्प्रेसने बिहार राज्यात पाठविल्याची माहिती कुडाळ तहसीलदार रवींद्र नाचणकर यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगारासाठी दरवर्षी हजारो कामगार विविध राज्यातून येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे हे सर्व कामगार सिंधुदुर्ग जिल्ह्यातच अडकले होते.

या सर्व कामगारांना प्रशासनाने त्यांच्या राज्यात जाण्यासाठी सोमवारी ओरोस रेल्वे स्थानक येथून विशेष श्रमिक एक्स्प्रेस या रेल्वेची व्यवस्था केली होती. या एक्स्प्रेसने ओरोस येथे जाण्यासाठी कुडाळ तालुक्यातील सुमारे ३०० परप्रांतीय कामगारांना कुडाळ एसटी प्रशासनाने एसटी बसची व्यवस्था केली होती. दुपारी १.३० वाजल्यापासून प्रत्येक बसमध्ये २१ प्रवासी घेऊन या बस ओरोस रेल्वे स्थानक येथे निघाल्या.

  • घरीच अलगीकरण करण्यात आलेले २१,६१0
  • संस्थात्मक अलगीकरणात असलेले २२,00८
  • पाठविण्यात आलेले एकूण नमुने १,४३५
  • अहवाल प्राप्त झालेले नमुने १,१५१
  • आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले नमुने १७
  • निगेटिव्ह आलेले नमुने १,१३४
  • अहवाल प्राप्त न झालेले नमुने २८४
  • विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण ८७
  • सद्यस्थितीत जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण १0
  • आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती ४१८0


 

Web Title: corona in sindhudurg- 40 persons in contact with the patient: K. Information of Manjulakshmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.