corona in sindhudurg-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरी क्षेत्रात दुचाकी फिरविण्यास बंदी : के. मंजुलक्ष्मी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 04:27 PM2020-04-09T16:27:00+5:302020-04-09T16:29:37+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरी क्षेत्रांमध्ये दुचाकीने फिरण्यास बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी, माध्यम कर्मचारी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे यांना सूट देण्यात आली आहे. त्यांनी स्वत:जवळ त्यांचे ओळखपत्र ठेवणे बंधनकारक आहे.
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील सर्व नागरी क्षेत्रांमध्ये दुचाकीने फिरण्यास बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी, माध्यम कर्मचारी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे यांना सूट देण्यात आली आहे. त्यांनी स्वत:जवळ त्यांचे ओळखपत्र ठेवणे बंधनकारक आहे.
नगरपालिका, नगर परिषद क्षेत्रामध्ये नागरिकांना घरपोच सेवा पुरविण्याच्या दृष्टीने नगर प्रशासनाने तयारी करावी. अशाप्रकारे घरपोच सेवा देणारऱ्या स्वयंसेवकांना, व्यापाऱ्यांना व वाहतूकदारांच्या कामगारांना नगर प्रशासनाने ओळखपत्रे द्यावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील लोकांसाठी तसेच मजूर, बेघर यांच्यासाठी जिल्ह्यात १० कॅम्प उभारले आहेत. त्यामध्ये सावंतवाडी तालुक्यात ४, मालवण तालुक्यात ५ आणि कुडाळ तालुक्यात ३ ठिकाणी असे एकूण १२ ठिकाणी कॅम्प स्थापन केले आहेत. तेथे परराज्यातील व जिल्ह्यातील आजमितीस ५०२ व्यक्ती असून त्यांची निवारा व जेवणाची व्यवस्था केली आहे. या सर्व लोकांना जेवणाची सुविधा मिळावी यासाठी तालुकास्तरावर शिवभोजन केंद्र स्थापन केले असून या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांची जेवणाची व्यवस्था केली आहे.
संबंधित तालुक्यातील तहसीलदार हे याविषयीचे नोडल आॅफिसर आहेत. मजूर व गरजूंच्या कॅम्पना मदत करायची असेल तसेच ज्येष्ठ नागरिक, आश्रमशाळा, वृद्धाश्रम, अनाथालय, वसतिगृहांना मदत हवी असेल तर त्यांनी विक्रम बहुरे - ९५१८९५०९०३, अशोक पोळ - ९७६६१४४०४१ यांच्याशी संपर्क साधावा.