Corona vaccine Sindhudurg : सिंधुदुर्गसाठी २० हजार कोविड लसींचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 01:57 PM2021-08-05T13:57:47+5:302021-08-05T14:06:51+5:30
Corona vaccine Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोविशिल्डच्या १७ हजार व कोवॅक्सीनच्या ३ हजार असे एकूण २० हजार लसीचे डोस आज उपलब्ध झाले आहेत,अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोविशिल्डच्या १७ हजार व कोवॅक्सीनच्या ३ हजार असे एकूण २० हजार लसीचे डोस आज उपलब्ध झाले आहेत,अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ज्यादा कोविड लसी पुरविण्याची मागणी मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी पत्राद्वारे केली होती. या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाचे सचिव रामा स्वामी यांना सिंधुदुर्गसाठी ज्यादा लसींचा पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकूण २० हजार लसीचे डोस आज उपलब्ध झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी यापूर्वी दरवेळी सुमारे चार हजार कोविड लसींचा पुरवठा केला जात होता. त्यामुळे नागरिकांना कोविड लसीकरणाच्या दुसऱ्या डोससाठी लसींची कमतरता भासत होती.यामुळे लसीकरण केंद्रांवर नागरिकांचा गोंधळ उडत होता.
आ. वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे याकडे लक्ष वेधले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना दुसऱ्या डोससाठी कोविशिल्डच्या १७ हजार व कोवॅक्सीनच्या ३ हजार असे एकूण २० हजार लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत.