Corona viras : आयर्लंडचे पंतप्रधान आणि मालवणी झील लिओ वराडकर रुग्णणसेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 09:23 PM2020-04-07T21:23:16+5:302020-04-07T21:27:17+5:30

आर्यलँडचे पंतप्रधान आणि मालवणी सुपुत्र लिओ वराडकर कोरोनाग्रस्तांसाठी पुन्हा डॉक्टर बनणार आहेत.

Corona viras: The Prime Minister of Ireland and the Konocho Lake Leo Varadkar Patient | Corona viras : आयर्लंडचे पंतप्रधान आणि मालवणी झील लिओ वराडकर रुग्णणसेवेत

Corona viras : आयर्लंडचे पंतप्रधान आणि मालवणी झील लिओ वराडकर रुग्णणसेवेत

Next
ठळक मुद्देआयर्लंडचे पंतप्रधान आणि कोकणचो झील लिओ वराडकर रुग्णणसेवेतपून्हा बनणार डॉक्टर

डबलिन : आयर्लंडचे पंतप्रधान आणि कोकणचे सुपुत्र लिओ वराडकर कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा डॉक्टरी पेशा स्वीकारणार आहेत.

राजकारणात प्रवेश करण्याआधी वराडकर हे डॉक्टरी पेशाच्या माध्यमातून रुग्णसेवा करत होते. आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी पु्न्हा एकदा रुग्णसेवा करण्यासाठी आपली नोंदणी केली आहे.

वराडकर यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, पंतप्रधान वराडकर यांच्या कुटुंबीयातील सदस्य आणि मित्र आरोग्य क्षेत्रात काम करत आहेत. त्याशिवाय स्वत: पंतप्रधान करोनाच्या महासंकटात प्रत्यक्ष मदत करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.

पंतप्रधान वराडकर हे आठवड्यातील काही दिवस रुग्णसेवेसाठी देणार आहेत. आयरिश टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, करोनाबाधित असलेल्या नागरिकांना फोनवरून समुपदेशन करण्याचे काम आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात येण्याची शक्यता आहे. आयर्लंडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना फोनवरून मार्गदर्शन केले जाते.

आयर्लंडच्या आरोग्य मंत्रालयाने मागील आठवड्यात रुग्णालय कर्मचाऱ्यांची भरती मोठ्या प्रमाणावर सुरू केली आहे. रुग्णालये, आरोग्य केंद्रातील रिक्त जागांवर ही भरती करण्यात येत असून कर्मचाऱ्यांची कमतरता कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

आयर्लंडमध्ये करोनाबाधितांची संख्या पाच हजारांच्याजवळ पोहचली आहे. मागील वर्षी म्हणजे डिसेंबर २०१९ मध्ये त्यांनी त्यांच्या गावी म्हणजे मालवणला भेट दिली होती.

Web Title: Corona viras: The Prime Minister of Ireland and the Konocho Lake Leo Varadkar Patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.