corona virus कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सहाशेच्या उंबरठ्यावर... दिवसभरात नवे २८ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 06:20 PM2020-05-31T18:20:10+5:302020-05-31T18:26:28+5:30
शनिवारपर्यत ही कोरोनाबाधीतांची संख्या ५६२ असली तरी रविवारी सायंकाळी त्यामध्ये २८ नव्या बाधितांची भर पडली, त्यामुळे ही संख्या ५९० वर पोहचली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सायंकाळपर्यत नवे २८ कोरोना पॉझीटिव्ह अहवाल प्राप्त झाले, त्यामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील पॉझीटिव्ह अहवालाची संख्या अधीक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची एकूण संख्या ५९० वर पोहचली आहे, रात्री उशीरापर्यत ही रुग्णसंख्या सहाशेचा टप्पा ओलांडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या वाढत आहे, यामध्ये मुंबईहून आलेल्या रुग़्णांची संख्या मोठी आहे. शनिवारी रात्रीपर्यत कोरोनाबाधीतांची संख्या ५६२ पर्यत पोहचली होती. पण दिवसे-दिवस मुंबईहून कोल्हापूर जिल्ह्यात येणार्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जात आहे. पण या संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्यातून कोरोनाबाधीतांचे चाचणी अहवाल पॉझीटिव्ह येत आहेत. शनिवारपर्यत ही कोरोनाबाधीतांची संख्या ५६२ असली तरी रविवारी सायंकाळी त्यामध्ये २८ नव्या बाधितांची भर पडली, त्यामुळे ही संख्या ५९० वर पोहचली आहे.