corona virus : सिंधुदुर्गात नवे १९ रूग्ण आढळले, संख्या पोहोचली १0९६ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 06:16 PM2020-08-29T18:16:58+5:302020-08-29T18:19:08+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे आज नव्याने १९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकुण रुग्णसंख्या १०९६ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ५९५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णसंख्या ४८२ एवढी आहे. आता पर्यंत कोरोनाने १९ जणांचा मृत्यू झाला आहे. दोडामार्गमधील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे आज नव्याने १९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकुण रुग्णसंख्या १०९६ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ५९५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णसंख्या ४८२ एवढी आहे. आता पर्यंत कोरोनाने १९ जणांचा मृत्यू झाला आहे. दोडामार्गमधील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
सकाळच्या सत्रात १० तर आता सायंकाळी ९ रूग्ण आढळले. त्यामुळे एकुण रूग्ण संख्या १०९६ झाली आहे. सायंकाळच्या ९ रूग्णांमध्ये कणकवली ६ रुग्ण मिळाले, यात कणकवलीतील फौजदार वाडी १, विद्यानगर ३, जानवली २. सावंतवाडी तालुक्यात ३ रुग्ण मिळाले.
जिल्ह्यात गणेश चतुर्थी चा सण असल्याने मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे कोरोना चे रुग्ण ही मोठ्या प्रमाणावर मिळत आहेत.
अनंत चतुर्थी नंतर हे प्रमाण कमी होईल अशी शक्यता आहे. मास्क चा वापर करा, सॅनिटायझर चा वापर करा अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. जिल्ह्यात २ लाख ४ हजार नागरिक दाखल झाले आहेत. तर १७६ कंटेंटमेंट झोन आहेत.
त्या खासगी डॉक्टरांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
गणेश चतुर्थी सणाच्या तोंडावर कणकवली तालुक्यातील ३ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली होती. खासगी डॉक्टर मंडळींना लागण झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. हे डॉक्टर कोरोना काळातली रुग्णांना सेवा देत होते. सुदैवाने त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.